IPL 2026 Points Table: आयपीएलचा क्लायमॅक्स सुरु! दिल्लीला पराभवाची धूळ चारत चेन्नई पुन्हा फॉर्ममध्ये, गुणतालिकेत उडवली खळबळ; मुंबई-केकेआरचं पॅकअप?

CSK Playoff Qualification Scenario: आयपीएल 2026 चा हंगाम आता अशा वळणावर पोहोचला, जिथे प्रत्येक सामन्यागणिक प्लेऑफची समीकरणे बदलत आहेत.
IPL 2026 Points Table
CSK Playoff Qualification ScenarioDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2026 Points Table: आयपीएल 2026 चा हंगाम आता अशा वळणावर पोहोचला, जिथे प्रत्येक सामन्यागणिक प्लेऑफची समीकरणे बदलत आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत गुणतालिकेत तळाला असलेला चेन्नई सुपर किंग्स संघ आता विजयाची मालिका रचत पुन्हा एकदा प्लेऑफच्या शर्यतीत सामील झाला. विशेष म्हणजे, जे संघ सुरुवातीला आघाडीवर होते त्यांना आता पराभवाचा सामना करावा लागत आहे, तर खालच्या क्रमांकावरील संघ मुसंडी मारत आपली दावेदारी भक्कम करत आहेत.

सध्याच्या गुणतालिकेचा विचार केला तर पंजाब किंग्स 13 अंकांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मात्र, पंजाबचा हा क्रमांक आता सुरक्षित राहिलेला नाही. आरसीबी (RCB), सनरायझर्स हैदराबाद (SRH), राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या चारही संघांचे प्रत्येकी 12 अंक असून ते पंजाबला कडवी झुंज देत आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करुन चेन्नईने 10 गुण मिळवले आहेत. चेन्नईचे अजून चार सामने शिल्लक असून या सर्व सामन्यांत विजय मिळवल्यास संघ 18 अंकांपर्यंत मजल मारु शकतो, जे प्लेऑफसाठी पुरेसे ठरतील. चेन्नईचा पुढील एक विजय त्यांना 12 अंकांपर्यंत घेऊन जाईल, ज्यामुळे त्यांचा 'टॉप 4' मध्ये प्रवेश करण्याचा मार्ग सोपा होईल.

IPL 2026 Points Table
IPL 2026 Points Table: गुणतालिकेत हायव्होल्टेज ड्रामा! गुजरात-केकेआरचा दणदणीत विजय; 4 संघ 12 गुणांवर, पंजाबचं अव्वल स्थान धोक्यात

याउलट दिल्ली कॅपिटल्ससाठी आता 'करो किंवा मरो' अशी स्थिती निर्माण झाली. 10 सामन्यांत केवळ 8 गुण मिळवलेला दिल्लीचा संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीला त्यांचे उरलेले सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे; एकाही पराभवामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्स (KKR), मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) या संघांचे आव्हान आता जवळपास संपुष्टात आल्याचे दिसत आहे. अधिकृतपणे हे संघ अद्याप बाहेर झाले नसले तरी, त्यांचे पुढील मार्ग अत्यंत खडतर झाले आहेत. एकूणच, आयपीएलचा हा उत्तरार्ध क्रिकेट चाहत्यांसाठी कमालीचा चुरशीचा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com