IPL 2024 Auction IPL
क्रीडा

IPL 2024: गोव्याचे 'हे' दोन क्रिकेटरही होणार मालामाल? लिलावासाठी निवडलेल्या 333 खेळाडूंमध्ये समावेश

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 लिलावासाठी निवड झालेल्या 333 खेळाडूंमध्ये गोव्याच्या दोन क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

Pranali Kodre

IPL 2024 Auction, 333 cricketers go under the hammer in Dubai on 19th December 2023:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या लिलावाची तयारी सुरु झाली आहे. हा लिलाव येत्या 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईत पार पडणार आहे. या लिलावासाठी आता नोंदणी केलेल्या खेळाडूंमधून आता अंतिम निवड झालेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आयपीएल 2024 हंगामाच्या लिलावासाठी 1166 खेळाडूंनी नोंदणी केल्याचे समोर आले होते. आता बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार नोंदणी केलल्या खेळाडूंमधून 333 खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड झाली आहे. त्यामुळे आता 333 खेळाडूंचे नाव लिलावावेळी पुकारले जाईल.

गोव्याचे दोन खेळाडू

या 333 खेळाडूंमध्ये 2 गोवा राज्याकडून खेळणारे खेळाडूही आहेत. हे दोन खेळाडू म्हणजे दर्शन मिसाळ आणि मोहित रेडकर. दर्शन गोव्याचा अनुभवी खेळाडू आहे, तर मोहितकडे उगवता तारा म्हणून पाहिले जात आहे.

31 वर्षीय दर्शन अष्टपैलू खेळाडू असून त्याने त्याच्या कारकिर्दीत 67 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 694 धावा केल्या आहेत आणि 55 विकेट्स घेतल्या आहेत. त्याबरोबर 23 वर्षीय मोहितही अष्टपैलू खेळाडू असून त्याने 7 टी20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 5 विकेट् घेतल्या आहेत. आयपीएल 2024 लिलावासाठी दोघांचीही मुळ किंमत 20 लाख आहे.

77 रिक्त जागा

दरम्यान, आयपीएल 2024 लिलावासाठी निवड झालेल्या 333 खेळाडूंमध्ये 214 भारतीय खेळाडू, 119 परदेशी खेळाडू आहेत, ज्यात 2 आयसीसीचे सहसदस्य देशांचे खेळाडू आहेत.

तसेच 333 खेळाडूंपैकी 116 कॅप (आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू) आणि 215 अनकॅप (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले खेळाडू) आहेत.

तथापि, लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड झाली असली तरी सर्व 10 संघात मिळून फक्त 77 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 77 खेळाडूंवरच बोली लागू शकते. यामध्ये 30 परदेशी खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे.

या 333 खेळाडूंमध्ये 23 खेळाडूंची 2 कोटी ही मुळ किंमत आहे, तर 13 खेळाडूंची 1.5 कोटी मुळ किंमत आहे.

कुठे आणि केव्हा होणार लिलाव?

आयपीएल 2024 हंगामाचा लिलाव 19 डिसेंबरला दुबईमधील कोका-कोला एरिनामध्ये रंगणार आहे. या लिलावाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरुवात होणार आहे.

सर्व संघांकडे शिल्लक असलेली रक्कम आणि खेळाडूंची जागा

चेन्नई सुपर किंग्स -

  • शिल्लक रक्कम - 31.4 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 3)

दिल्ली कॅपिटल्स

  • शिल्लक रक्कम - 28.95 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 9 (परदेशी खेळाडू - 4)

गुजरात टायटन्स

  • शिल्लक रक्कम - 38.15 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 2)

कोलकाता नाईट रायडर्स

  • शिल्लक रक्कम - 32.7 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 12 (परदेशी खेळाडू - 4)

लखनऊ सुपर जायंट्स

  • शिल्लक रक्कम - 13.15 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 2)

मुंबई इंडियन्स

  • शिल्लक रक्कम - 17.75 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 4)

पंजाब किंग्स

  • शिल्लक रक्कम - 29.1 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 2)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

  • शिल्लक रक्कम - 23.25 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 3)

राजस्थान रॉयल्स

  • शिल्लक रक्कम - 14.5 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 3)

सनरायझर्स हैदराबाद

  • शिल्लक रक्कम - 34 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 3)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT