IPL 2024 Auction: तारीख अन् ठिकाण ठरलं! 'या' दिवशी दुबईत रंगणार लिलाव, BCCI ची घोषणा

IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव दुबाईमध्ये पार पडणार आहे.
IPL Auction
IPL Auction Dainik Gomantak

IPL 2024 Auction date and Venue:

इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाची तयारी सर्व फ्रँचायझींकडून सुरु झाली आहे. हा आयपीएलचा 17 वा हंगाम आहे. दरम्यान आता या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित झाले आहे. याबद्दल बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे.

आयपीएलने एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये लिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार यंदाचा आयपीएल लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये रंगणार आहे. हा छोट्या स्वरुपातील लिलाव असल्याने एकच दिवस होणार आहे.

दरम्यान, आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच परदेशात होणार आहे. यापूर्वी झालेले लिलाव भारतात झाले होते.

IPL Auction
WPL 2024: अवघ्या 30 जागांसाठी 165 खेळाडू लिलावाच्या मैदानात! कोणत्या संघात किती जागा अन् पैसे शिल्लक?

तसेच यंदा फ्रँचायझींसाठी लिलावाचे पैसे म्हणजेच पर्स मनी वाढवण्यात आली आहे. यावेळी फ्रँचायझींकडे खेळाडूंवर बोली लावण्यासाठी 100 कोटी रुपये असणार आहेत. त्यामुळे संघांनी आपल्या संघात आयपीएल 2024 साठी कायम केलेल्या खेळाडूंनंतर जितके पैसे उरले आहेत, त्यातून लिलावावेळी संघबांधणी करावी लागणार आहे.

आगामी हंगाम हा खेळाडूंच्या तीन वर्षांच्या करारातील अखेरचा हंगाम असणार आहे. त्यानंतर पुन्हा पुढीलवर्षी 2025 हंगामासाठी मेगा लिलाव पार पडेल.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2024 लिलावासाठी 1166 खेळाडूंनी नावनोंदणी केली आहे. ही नावं फ्रँचायझींना पाठवण्यात आली असून त्यातील नावे फ्रँचायझींकडून शॉर्ट लिस्ट केली जाणार आहेत.

दरम्यान, 10 संघात मिळून केवळ 77 जागा रिक्त आहेत. यामधील 30 जागांवर परदेशी खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. तसेच लिलावात 10 संघ मिळून जास्तीत जास्त 262.95 कोटी रुपये खर्च करू शकतात.

IPL Auction
IPL 2024 लिलावासाठी तब्बत 1166 खेळाडूंनी केलं रजिस्ट्रेशन! 'या' खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी

सर्व संघांकडे शिल्लक असलेली रक्कम आणि खेळाडूंची जागा

चेन्नई सुपर किंग्स -

  • शिल्लक रक्कम - 31.4 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 3)

दिल्ली कॅपिटल्स

  • शिल्लक रक्कम - 28.95 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 9 (परदेशी खेळाडू - 4)

गुजरात टायटन्स

  • शिल्लक रक्कम - 38.15 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 2)

कोलकाता नाईट रायडर्स

  • शिल्लक रक्कम - 32.7 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 12 (परदेशी खेळाडू - 4)

लखनऊ सुपर जायंट्स

  • शिल्लक रक्कम - 13.15 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 2)

मुंबई इंडियन्स

  • शिल्लक रक्कम - 17.75 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 4)

पंजाब किंग्स

  • शिल्लक रक्कम - 29.1 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 2)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

  • शिल्लक रक्कम - 23.25 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 3)

राजस्थान रॉयल्स

  • शिल्लक रक्कम - 14.5 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 3)

सनरायझर्स हैदराबाद

  • शिल्लक रक्कम - 34 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 3)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com