Rajasthan Royals Dainik Gomantak
क्रीडा

PBKS vs RR: शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थानची बाजी! पंजाबचे पराभवासह IPL 2023 मधील आव्हान संपुष्टात

आयपीएल २०२३ स्पर्धेत पंजाब किंग्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध अखेरच्या षटकात पराभव स्विकारावा लागला, याबरोबरच त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.

Pranali Kodre

Punjab Kings vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात 66 वा सामना झाला. धरमशालातील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने अखेरच्या षटकात 4 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात पराभव झाल्याने पंजाबला पराभव स्विकारावा लागल्याने त्यांचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. पण त्यांना उर्वरित चार सामन्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

या सामन्यात पंजाबने राजस्थान समोर विजयासाठी 188 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग राजस्थानने 19.4 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केला. अखेरच्या 3 चेंडूत 5 धावांची गरज असताना ध्रुव जुरेलने षटकार ठोकला आणि राजस्थानला विजय मिळवून दिला.

पंजाबने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर यांनी डावाची सुरुवात केली होती. पण बटलरला दुसऱ्याच षटकात शुन्यावर कागिसो रबाडाने बाद केले.

पण त्यानंतर जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरत 73 धावांची भागीदारी केली. या दरम्यान पडिक्कलने अर्धशतकी खेळी केली. पण अर्धशतकानंतर तो बाद झाला. त्याने 30 चेंडूत 51 धावांची खेळी केली. पण त्यानंतर लगेचच संजू सॅमसनला राहुल चाहरने 2 धावांवर बाद केले होते.

पण नंतर जयस्वाल आणि शिमरॉन हेटमायर यांनी चांगला खेळ करत 47 धावांची भागीदारी केली. मात्र जयस्वालने अर्धशतक केल्यानंतर नॅथन एलिसने त्याला ऋषी धवनच्या हातून झेलबाद केले. जयस्वालने 50 धावांची खेळी केली.

अखेरीस रियान परागने कागिसो रबाडाने गोलंदाजी केलेल्या 18 व्या षटकात आक्रमक खेळ केला. पण तो 12 चेंडूत 20 धावा करून याच षटकात बाद झाला. त्यानंतरही शिमरॉन हेटमायरने आपली लय कायम ठेवली होती. पण 19 व्या षटकात सॅम करनने हेटमायरला 46 धावांवर बाद केले. शिखर धवनने त्याचा शानदार झेल घेतला. त्यामुळे सामन्याला रोमांचक वळण मिळाले होते.

अखेरच्या षटकात राजस्थानला 9 धावांची गरज होती. त्यावेळी राहुल चाहर गोलंदाजी करत होता. त्यावेळी ध्रुव जुरेल आणि ट्रेंट बोल्ट फलंदाजी करत होते. जुरेलने पहिल्या दोन चेंडूत 3 धावा काढल्या.

त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर बोल्टने एकेरी धाव धावत पुन्हा जुरेलला स्ट्राईट दिली. जुरेलने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जुरेल 10 धावांवर नाबाद राहिला, तर बोल्ट 1 धावेवर नाबाद राहिला.

पंजाबकडून कागिसो रबाडाने 2 विकेट्स घेतल्या. तसेच सॅम करन, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार शिखर धवनने डावाची सुरुवात केली. पण पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने प्रभसिमरनला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर शिखर आणि अर्थर्व तायडे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण अथर्वला चौथ्या षटकात नवदीप सैनीने 19 धावांवर बाद केले.

तसेच धवन सहाव्या षटकात ऍडम झम्पाविरुद्ध खेळताना 17 धावांवर पायचीत झाला. पुढच्याच षटकात नवदीप सैनीने धोकादायक लियाम लिव्हिंगस्टोनला 9 धावांवर त्रिफळाचीत करत पंजाबला मोठा धक्का दिला. मात्र, त्यानंतर जितेश शर्मा आणि सॅम करन यांनी डाव सावरताना 5 व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

पण जितेशला सैनीनेच बाद करत त्याची करनबरोबरची 64 धावांची भागीदारी तोडली. जितेशने 28 चेंडूत 44 धावांची खेळी केली. पण त्यानंतरही करन आणि शाहरुख खान यांनी आक्रमक खेळ केला. त्या दोघांनी युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर 19 व्या षटकात 28 धावा चोपल्या, तर अखेरच्या षटकात शाहरुखने ट्रेंट बोल्टविरुद्ध 18 धावा काढल्या.

त्यामुळे या दोघांची 6 व्या विकेटसाठी 37 चेंडूतच नाबाद 73 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे पंजाबने 20 षटकात 5 बाद 187 धावा केल्या. सॅम करन 31 चेंडूत 49 धावांवर नाबाद राहिला, तर शाहरुख 23 चेंडूत 41 धावांवर नाबाद राहिला.

राजस्थानकडून नवदीप सैनीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

SCROLL FOR NEXT