Jos Buttler 5th Duck: बटलरची डकची हॅटट्रीक! IPL इतिहासात 'हा' नकोसा रेकॉर्ड करणारा पहिलाच फलंदाज

जॉस बटलर आयपीएल 2023 मध्ये पाचव्यांदा शुन्यावर बाद झाला असल्याने त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.
Jos Buttler
Jos ButtlerDainik Gomantak

Jos Buttler 5th Duck in IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी (19 मे) पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात 66 वा सामना होत आहे. धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यादरम्यान राजस्थानचा अनुभवी सलामीवीर जॉस बटलरच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.

पंजाबने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी राजस्थानकडून जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. पहिले षटक पूर्ण जयस्वालने खेळून काढताना 12 धावा काढल्या.

त्यानंतर दुसऱ्या षटकात जॉस बटलर फलंदाजीला आला. या षटकात गोलंदाजी करत असलेल्या कागिसो रबाडाने पहिल्या तीन चेंडूवर बटलरला एकही धाव करू दिली नाही. त्याचबरोबर चौथ्या चेंडूवर त्याने शानदार चेंडू टाकत बटलरला पायचीत पकडले. त्यामुळे बटलर शुन्यावरच बाद झाला.

Jos Buttler
IPL Playoff Equation: बेंगलोरच्या विजयाने मुंबईच्या अडचणीत वाढ, पाहा कसे आहे RCB साठी समीकरण

एकाच हंगामात 5 वेळा शुन्य

आयपीएल 2023 स्पर्धेत बटलरची ही शुन्यावर बाद (डक) होण्याची पाचवी वेळ होती. विशेष म्हणजे तो सलग तिसऱ्यांदा शुन्यावर बाद झाला. यापूर्वी तो 11 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आणि 14 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध शुन्यावर बाद झाला होता.

तसेच त्याआधी तो 23 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धच आणि 16 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध शुन्यावर बाद झाला होता. त्यामुळे बटलर एकाच आयपीएल हंगामात 5 वेळा शुन्यावर बाद होणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Jos Buttler
Jos Buttler: बटलरला महागात पडली रनआऊट नंतरची 'ती' चूक? BCCI ने केली मोठी कारवाई

यापूर्वी हर्षेल गिब्स, मिथून मन्हास, मनिष पांडे, शिखर धवन, ओएन मॉर्गन आणि निकोलस पूरन हे एकाच आयपीएल हंगामात चार वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.

एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारे खेळाडू

  • 5 वेळा - जॉस बटलर (2023, राजस्थान रॉयल्स)

  • 4 वेळा - हर्षेल गिब्स (2009, डेक्कन चार्जर्स)

  • 4 वेळा - मिथून मन्हास (2011, पुणे वॉरियर्स)

  • 4 वेळा - मनिष पांडे (2012, पुणे वॉरियर्स)

  • 4 वेळा - शिखर धवन (2020, दिल्ली कॅपिटल्स)

  • 4 वेळा - ओएन मॉर्गन (2021, कोलकाता नाईट रायडर्स)

  • 4 वेळा - निकोलस पूरन (2021, पंजाब किंग्स)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com