पाकिस्तानचा (Pakistan) माजी खेळाडू शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) लाईव्ह शोमध्ये अँकरने अपमान केला,  Dainik Gomantak
क्रीडा

Live शोमध्ये शोएब अख्तरचा अपमान, मधेच शो सोडण्याची आली वेळ...पहा व्हिडिओ

शोमध्ये शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) पाकिस्तान (Pakistan) सुपर लीग फ्रँचायझी लाहोर कलंदर्सला शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि हॅरिस रौफ (Harris Rauf) यांच्या संघात आगमनाचे श्रेय दिले. याबद्दल होस्ट नौमान नियाजने नापसंती व्यक्त करत अख्तरला शो सोडण्यास सांगितले.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचा (Pakistan) माजी खेळाडू शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) लाईव्ह शोमध्ये अँकरने अपमान केला, तो दुसरा कोणी नसून पाकिस्तानच्या PTV स्पोर्ट्स चॅनलचा (PTV Sports Channel) अँकर होता. शोएब अख्तरने सर व्हिव्हयन रिचर्ड्ससारख्या (Vivian Richards) दिग्गजांसमोर गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर शोएब अख्तरने स्वत: याबाबतचा खुलासा केलेला व्हिडिओ देखील आहे. हे संपूर्ण प्रकरण पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) सामन्यानंतर घडले.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची चर्चा पाकिस्तानच्या चॅनल पीटीव्ही स्पोर्ट्सवर सुरु होती, ज्यामध्ये शोएब अख्तरसोबत सर रिचर्ड, डेव्हिड गोवर, सना मीर आदी क्रिकेटचे जाणकार देखील होते. शोमध्ये शोएब अख्तरने पाकिस्तान सुपर लीग फ्रँचायझी लाहोर कलंदर्सला शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांच्या संघात आगमनाचे श्रेय दिले. याबद्दल होस्ट नौमान नियाजने नापसंती व्यक्त करत अख्तरला शो सोडण्यास सांगितले.

प्रकरण बिघडत असल्याचे पाहून शोच्या होस्टने ब्रेक घेतला, मात्र परतल्यानंतरही स्टुडिओतील वातावरण फ्रेंडली होताना दिसत नव्हते. ब्रेकमधून आल्यानंतर अख्तर म्हणाला, मला माफ करा, मी पुन्हा पीटीव्ही जॉईन करत आहे. नॅशनल टीव्हीवर मला ज्याप्रकारे वागणूक दिली गेली, मला वाटत नाही की मी इथे बसावे, म्हणून मी येथून जात आहे. धन्यवाद यानंतर अख्तर यांनी माईक काढून स्टुडिओ सोडला.

त्यानंतर शोएब अख्तरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेर करत आपले मत स्पष्ट केले. त्याने होस्टला ब्रेकमध्येही माफी मागण्यास सांगितले, परंतु त्याने नकार दिला आणि नंतर मी पुढे गेलो नाही. असे अख्तरने नमूद केले. यामुळे जागतिक स्तरावर चांगला संदेश गेला नसता, म्हणून मी तेथून निघालो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT