सचिन तेंडुलकर हा महानच: शोएब अख्तर

माझ्या 'त्या' विधानाचा माध्यमातून विपर्यास केला गेला, माझा हेतू कधीच कोणाला दुखविण्याचा नव्हता.
शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) एक मोठे विधान केले आहे.
शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) एक मोठे विधान केले आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्याला मैदानाबाहेर आणि चाहत्यांमध्ये उत्साह आहे. यावर दोन्ही संघांच्या माजी क्रिकेटपटूंमध्ये देखील चर्चा सुरू झाली आहे.

आयसीसी टी -20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारत 24 ऑक्टोबरला यूएईमध्ये (UAE) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करणार आहे. पण यास्पर्धे अगोदर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) एक मोठे विधान केले आहे. सचिन त्याच्या गोलंदाजीला घाबरत होता, या माझ्या विधानाचा माध्यमातून विपर्यास केला गेला या माझा हेतू कधीच कोणाला दुखविण्याचा नव्हता. याबाबत एका माध्यमाशी बोलताना शोएब अख्तरने या घटनेबद्दल उघडपणे सांगितले आहे. तो म्हणाला, माध्यमांनी निर्माण केलेली ही एक प्रसिद्धी होती, जी चूकीची आहे.

शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) एक मोठे विधान केले आहे.
T-20 World Cup: पाकिस्तानची फलंदाजी पाहून भारताने तयार केला 'मास्टर प्लॅन'

मला ही गोष्ट स्पष्ट करायची आहे की, ही सगळी मीडियाचीच प्रसिध्दी होती. ही गोष्ट अशी आहे की, जेव्हा आपण पुस्तक लिहीतो तेव्हा तुम्हाला सर्वकाही समजावून सांगावे लागते. कारण त्यात काही गोष्टी संदर्भाबाहेरच्या देखील घेतल्या जातात. मी फैसलाबादमध्ये सांगितले होते, सचिनला टेनिस एल्बोची दुखापत झाली होती, त्यावेळी तो हुक आणि पुल शॉट खेळू शकत नव्हता. म्हणून मी त्याला अखूड टप्प्याची गोलंदाजी करण्याचा विचार केला कदाचित टेनिस एल्बोमुळे त्याला काही शॉटचा वापर करता येत नव्हता म्हणून मी त्याला घाबरवले. मी कधीही लिहिले नाही सचिन माझ्या गोलंदाजीला घाबरतो. तो एक महान खेळाडू नाही असेही मी म्हटले नाही, असे शोएब अख्तरने स्पष्ट केले.

तो पुढे म्हणाला, "मला सचिनबद्दल खूप आदर आहे. मी 2016 मध्ये त्याच्या घरी देखील गेलो होतो आणि त्याला सांगितले. त्याने माझ्यासाठी एक छान डिश स्वत: केली होती. तो एक उत्तम स्वयंपाकी आणि चांगला माणूस आहे. मी त्याच्याबद्दल काय लिहिले होते ते त्याला सांगितले त्यावेळी सचिन म्हणाला, 'जे काही आहे ते सर्व सोडा, तू मला गुवाहाटीच्या एका सामन्यादरम्यान टाकलेला चेंडू माझ्या बरगडीला लागला होता. त्या रात्री मी हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळी कळले की माझ्या बरगडीला फ्रॅक्चर आहे. असे सचिनने सांगितले.

शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) एक मोठे विधान केले आहे.
T-20 World Cup 2021: भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी सानिया सोशल मीडियापासून दूर

त्या सामन्यात पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी विरुध्द खेळताना तो श्वास घेऊ शकत नव्हता, सचिनला सौरव गांगुली देखील काहीतरी बोलत होता पण तरी त्याने मैदान सोडले नाही. मी त्याला विचारले की तू मला का नाही सांगितले? सचिन म्हणाला, त्यावेळी भारतीय संघाची स्थिती नाजूक होती. मला देखील माहिती नव्हते की मला फ्रॅक्चर झाले आहे. मी हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळी मला समजले माझ्या 12 किंवा 13 व्या बरगडीला फ्रॅक्चर आहे. पण मी खेळत राहिलो.

असे सांगत अख्तर पुढे म्हणाला, मी सचिन किंवा गांगुली माझ्या गोलंदाजीला घाबरता असे मी कधीच म्हटले नाही. हे फक्त मीडियाचा प्रचार होता. ते महान फलंदाज आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com