Team India Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 2nd ODI: मालिका विजयासाठी उतरणार टीम इंडिया, सूर्या होणार संघाबाहेर? अशी असेल संभावित Playing XI

West Indies vs India: वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दुसरा वनडे सामना शनिवारी खेळला जाणार आहे.

Pranali Kodre

India's Predicted Playing XI for Second ODI against West Indies: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (29 जुलै) खेळवला जाणार आहे. हा सामना बार्बाडोस येथील ब्रिजटाउनमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानात खेळवला जाणार आहे.

हा सामना जिंकून भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याचीही संधी आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 5 विकेट्सने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे दुसरा मालिका जिंकल्यास भारत मालिकेतील विजयावर हक्क सांगेल. त्याचमुळे वेस्ट इंडिज संघही दुसरा सामना जिंकून आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय संघव्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देणार हे पाहाणे औत्सुक्याचे आहे. पहिल्या वनडेमध्ये यष्टीरक्षक म्हणून इशान किशनला संधी मिळाली होती. त्यानेही या संधीचा वापर करत अर्धशतक झळकावले होते. पण त्यामुळे संजू सॅमसनला बाहेर बसावे लागले होते.

दरम्यान, दुसऱ्या वनडेसाठी इशानला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम केले, तरी सॅमसनलाही संधी दिली जाऊ शकते. सॅमसनला सूर्यकुमार यादव ऐवजी संधी दिली जाऊ शकते. सूर्यकुमार यादवची वनडे क्रिकेटमध्ये फारशी चांगली कामगिरी राहिलेली नाही.

त्यामुळे वनडेत 66 ची सरासरी असलेल्या सॅमसनला त्याच्या जागेवर संधी दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त बदल होण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे फलंदाजी फळीत रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली यांच्याबरोबर यष्टीरक्षक इशान किशन असेल. तसेच रविंद्र जडेजा फिरकी गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही योगदान देऊ शकतो, त्याच्याप्रमाणेच उपकर्णधार हार्दिक पंड्या वेगवान गोलंदाजीबरोबरच मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो.

गोलंदाजी फळीत उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार हे कायम राहू शकतात.

दुसऱ्या वनडेसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव/संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

SCROLL FOR NEXT