IND vs WI 1st ODI: इशान-कुलदीपच्या जोरावर टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर पाच विकेट्सने विजय!

बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला.
ishan kisan
ishan kisanDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs WI 1st ODI India Beat West Indies by 5 Wickets: बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 23 षटकांत केवळ 114 धावाच करु शकला.

प्रत्युत्तरात भारताने 23 षटकात 5 विकेट गमावत 118 धावा करत सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून इशान किशनने सर्वाधिक 52 धावा केल्या.

115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का शुभमन गिलच्या रुपाने बसला. भारताने 10व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 19 धावा करुन बाद झाला. तर हार्दिक पांड्या 5 धावा करुन धावबाद झाला. इशानने शानदार अर्धशतक पूर्ण केले. इशाननंतर शार्दुल ठाकूर बाद झाला.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 23 षटकांत केवळ 114 धावाच करु शकला. कर्णधार शाई होपने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर कुलदीप यादवने 3 षटकात 6 धावा देत 4 बळी घेतले.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्येच संघाने तीन गडी गमावले. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. हार्दिकने काइल मायर्सला झेलबाद केले. मायर्स 9 चेंडूत दोन धावा करुन बाद झाला.

ishan kisan
WI vs IND, 1st ODI: टीम इंडियाकडून मुकेश कुमारचे पदार्पण! पहिल्या वनडेसाठी दोन्ही संघांची अशी आहे Playing XI

यानंतर, मुकेश कुमारने अथनाजेला बाद करुन विंडीजला दुसरा धक्का दिला. 18 चेंडूत 22 धावा करुन अॅलिक आऊट झाला. ब्रँडन किंग 23 चेंडूत 17 धावा करुन बाद झाला. जडेजाने हेटमायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

त्याच्या पुढच्याच षटकात जडेजाने दोन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने दुसऱ्या चेंडूवर पॉवेलला तर चौथ्या चेंडूवर शेफर्डला बाद केले.

पुढच्याच षटकात कुलदीप यादवने ड्रेक्सला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याच्या दुसऱ्याच षटकात कुलदीपने विकेट घेतली, कारियाह 3 धावांवर एलबीडब्ल्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com