Shafali Verma Dainik Gomantak
क्रीडा

Shafali Verma: "25 मिनिट आधी आले, विनंती केली, तरीही फ्लाईटसाठी एन्ट्री नाकारली...", शफालीचा एअरलाईन कंपनीवर संताप

Shafali Verma: शफाली वर्माने सोशल मीडिया पोस्टमधून एका एअरलाईनविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

Pranali Kodre

Shafali Verma disappointed after denied entry by airline: भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा फलंदाज शफाली वर्मा सध्या एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिने मैदानातील केलेली कामगिरी नव्हे, तर एका एअरलाईनविरुद्ध व्यक्त केलेला संताप आहे.

शफालीने इंडिगो एअरलाईन स्टाफकडून वाईट वागणूकीची तक्रार केली आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

शफालीने केलेल्या पोस्टनुसार तिला दिल्लीवरून वाराणसीला जायचे होते. यावेळी ती २५ मिनिटे आधी पोहचली होती, तसेच तिने विनंती केल्यानंतरही तिला फ्लाईटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

शफालीने पोस्टमध्ये लिहिले की 'दिल्ली ते वाराणसी. मी फ्लाईट टेकऑफ होण्याच्या २५ मिनिट आधी पोहचले आणि विनंतीही केली, पण मला प्रवेश मिळाला नाही. स्टाफकडून मिळणारी वागणूकही खराब होती. इंडिगोचा चांगला अनुभव नव्हता.'

दरम्यान, तिच्या या ट्वीटनंतर काही युजर्सने तिलाच ट्रोल केले आहे. काही सोशल मीडिया युजर्सने कमेंट केले आहे की कंपनीने त्यांचे नियम पाळले असून शफालीने पोहोचायला उशीर केला. काही युजर्सने तिला 1 ते 2 तास आधी यायचे होते, असा सल्लाही दिला आहे.

शफाली खेळणार एशियन गेम्समध्ये

शफली आता चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये खेळताना दिसणार आहे. तिचा या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत तिची लय परतण्याची अपेक्षा चाहत्यांना असणार आहे.

एशियन गेम्समध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा झेजियांग युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट फिल्ड येथे 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा टी20 क्रिकेट प्रकारात खेळली जाईल.

शफालीची कारकिर्द

शफालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 कसोटी, 22 वनडे आणि 59 टी20 सामने खेळले आहेत. तिने कसोटीत 3 अर्धशतकांसह 242 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तिने वनडेत 4 अर्धशतकांसह 535 घावा केल्या आहेत. यारोबरच तिने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1363 धावा केल्या असून 5 अर्धशतकांचा यात समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT