Suryakumar Yadav Retirement: 'रिटायर होणार का'? कॅप्टन सूर्याने दिले पहिल्यांदाच उत्तर; हसत हसत म्हणाला की....

Suryakumar Yadav retirement: गतवेळेस विश्वकरंडक जिंकल्यानंतर रोहित शर्मासह विराट कोहलीने टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली होती.
Suryakumar Yadav retirement
Suryakumar Yadav retirementDainik Gomantak
Published on
Updated on

अहमदाबाद: टी-२० विश्वकरंडकसाठी अगोदरपासून सुरू झालेल्या मोहिमेचा ईशान किशन सदस्य नव्हता, परंतु देशांतर्गत स्पर्धांत त्याने केलेल्या शानदार कामगिरीची दखल घेतली जात होती आणि त्यामुळेच त्याला संघात स्थान मिळाले, परंतु ते कसे, हा प्रसंग ईशान किशनने उघड केला.

सूर्याने मला फोन केला, हा फोन कदाचित विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याबाबत असू शकेल, असे मला वाटत होते, म्हणून मी त्याचा स्क्रीनशॉटही काढला...समोरून आवाज आला, वर्ल्डकप जिंकून देशील का? त्यावर मी म्हटले...विश्वास आहे ना ! त्यानंतर सूर्याने मला तयार व्हायला सांगितले. कर्णधाराबरोबरचा हा संवाद ईशानने रविवारी विजेतेपद मिळवल्यानंतर उघड केला.

वास्तविक त्याअगोदर माझ्या चुलत बहिणीचे कार अपघातात निधन झाले होते. त्यामुळे दुःखी होतो. यातच विश्वकरंडक स्पर्धेत निवड होण्याची ही चांगली बातमी समजली. मी तयार झालो आणि प्रत्येक सामन्यात खेळताना माझी बहीण आठवत होती. तिच्यासाठी मी खेळत होतो, असे ईशानने सांगितले.

या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध निर्णायक खेळी करणाऱ्या ईशानने स्पर्धेत मिळून २४१ धावा फटकावल्या. अंतिम सामन्यातील त्याचे वेगवान अर्धशतकही खास ठरले. हे अर्धशतक मी तिच्यासाठी अर्पण केले.

Suryakumar Yadav retirement
Sanju Samson: भारतीय दिग्गज खेळाडूने 'संजू सॅमसन'बाबत केले मोठे वक्तव्य! म्हणाला, " त्याच्याकडून निराशा झाली, संघातून काढण्यात आले.."

आता ऑलिंपिक सुवर्ण जिंकायचेय

गतवेळेस विश्वकरंडक जिंकल्यानंतर रोहित शर्मासह विराट कोहलीने टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली होती. असाच निर्णय ३५ वर्षीय सूर्यकुमार घेणार का, अशी दबक्या आवाजात चर्चा होत होती, तसा त्याला प्रश्नही विचारण्यात आला. अजून ऑलिंपिक सुवर्णपदक आणि पुढच्या वर्षीही टी-२० विश्वकरंडक जिंकायचाय, असे हसत हसत उत्तर देत सूर्यकुमारने प्रश्न विचारणाऱ्याची फिरकी घेतली.

Suryakumar Yadav retirement
Team India Victory Parade: टीम इंडियाच्या विजयाचे सेलिब्रेशन! कुठे होणार 'व्हिक्ट्री परेड'? दिल्लीत की मुंबईत? सर्व जाणून घ्या

विजेत्या भारतीय संघातील १५ खेळाडूंपैकी सूर्यकुमारच ३५ वर्षीय आहे. दोन वर्षांनंतर लॉस एंजेलिस ऑलिंपिक आणि पुढील टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे.

२०२४ नंतरचा कालावधी आमच्यासाठी चांगला यशस्वी ठरला. या काळात आम्ही सलग तीन आयसीसी करंडक जिंकले (दोन टी-२० आणि चॅम्पियन्स करंडक), असे सूर्यकुमारने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com