Pranali Kodre
भारताची युवा महिला क्रिकेटपटू शफाली वर्मा 28 जानेवारी 2023 रोजी तिचा 19 वा वाढदिवस साजरा करत आहे.
शफाली सध्या पहिल्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप खेळण्यात व्यस्त असून ती या स्पर्धेसाठी भारतीय संघाची कर्णधारही आहे.
महत्त्वाचे म्हणजे तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेशही केला आहे.
शेफाली ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वरिष्ठ महिला संघाकडूनही खेळली आहे.
तिने अवघ्या वयाच्या 15 व्या वर्षी सप्टेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
तिने वरिष्ठ भारतीय महिला संघाचे टी20, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे.
ती वयाच्या 17 व्या वर्षीच भारताकडून टी20, वनडे आणि कसोटी असे तिन्ही प्रकारात किमान एक तरी सामना खेळली होती.
ती सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळलेली जगातील महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंमध्ये पाचव्या क्रमांकाची खेळाडू आहे.
शफालीचा जन्म 28 जानेवारी 2004 रोजी हरियाणामधील रोहतक शहरात झाला होता.
तिने मुलींसाठी वेगळी अकादमी नसल्याने मुलांबरोबर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
तिला लहानपणी मोठे शॉट्स खेळल्यावर वडिलांकडून 10 रुपयांचे बक्षीस मिळायचे, त्यामुळे तिची फलंदाजी शैलीही आक्रमक आहे.
तिच्या आक्रमक आणि निडर फलंदाजीमुळे तिला लेडी सेहवाग म्हणूनही ओळखले जाते.
तिने वेस्ट इंडीजविरुद्ध 9 नोव्हेंबर 2019 रोजी टी२० सामन्यात 42 चेंडूत 73 धावांची खेळी केलेली तेव्हा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता.
तिने हे अर्धशतक केले तेव्हा तिचे वय 15 वर्षे 285 दिवस होते, त्यामुळे ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारी भारतीय क्रिकेटपटू बनली होती.
यापूर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. त्याने 16 वर्षे 214 दिवस वय असताना पाकिस्तानविरुद्ध पहिले अर्धशतक केले होते.