Naushad Khan| Sarfaraz Khan|Mushir Khan Dainik Gomantak
क्रीडा

U19 Asia Cup: 'बाप'माणूस ज्याने घडवले दोन क्रिकेटपटू! सर्फराजनंतर आता मुशीर करणार टीम इंडियाकडून पदार्पण

Sarfraj Khan: नौशाद यांचे स्वप्न भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे होते, पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. इतकेच काय तर नौशाद यांना मुंबईकडून एकही रणजी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. होय, ते अनेकदा मुंबई रणजी संघाच्या संभाव्य खेळाडूंमध्ये असायचे.

Ashutosh Masgaunde

Indian cricketer Sarfaraz Khan's brother Mushir Khan is all set to make his debut for Team India in the Under-19 Asia Cup:

नौशाद खान 2014 मध्ये, धाकट मुलगा मुशीरसोबत दुबईत मोठा मुलगा सरफराजला भारताच्या U-19 मध्ये पदार्पण करताना पाहण्यासाठी गेले होते तेव्हा ते भावणिक होण्यापासून स्वतःला रोखू शकले नव्हते.

आता नौशाद खान नऊ वर्षांनंतर, पुन्हा दुबईत पोहचले आहेत. मात्र, यावेळी त्यांचा मोठा मुलगा सर्फराज नव्हे तर मुशीर हा युवा एशिया कपमध्ये भारताच्या अंडर-19 कडून खेळताना दिसणार आहे.

Mushir Khan

"जेव्हा मी फ्लाइटमध्ये होतो, तेव्हा मला नऊ वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतो. माझ्याकडे सर्फराज आणि त्यानंतर संघाचे प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासोबतचा त्याचा फोटो अजूनही आहे. माझ्यासाठी आयुष्याचे वर्तुळ आता पूर्ण झाले आहे. आणि मी पुन्हा दुबईतून खूप काही आठवणी घेऊन भारतात परतणार आहे. हा माझ्यासाठी अभिमान आणि आनंदाचा क्षण आहे," असे नौशाद दुबईत पोहचल्यानंतर म्हणाले.

अव्वल फळीतील आश्वासक आणि आक्रमक फलंदाज आणि डावखुरा फिरकीपटू असलेला मुशीर आता भारताच्या अंडर-19 संघात पदार्पण करणार आहे. तर त्याचा मोठा भाऊ सरफराज भारताच्या अ संघासोबत चार दिवसीय सामने खेळण्यासाठी एक दिवस आधी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे.

Sarfraj Khan

सरफराज म्हणाला की, त्याने त्याने त्याच्या धाकट्या भावाला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. "मी माझा अनुभव त्याच्याशी शेअर केला आहे. जेणेकरून तो माझ्या चुकांमधून शिकू शकेल. त्याच्याकडे माझ्यासारखीच खेळासाठी कष्ट करण्याची नीतिमत्ता आहे आणि आम्ही दोघे कठोर मेहनत करत असतो. त्याला एक गोष्ट सांगितली आहे की, जीवनात कोणताही शॉर्टकट नसतो."

Naushad Khan

कोण आहेत नौशाद खान?

खान कुटुंब मुंबईच्या कुर्ला भागात राहते, ज्यांचे प्रमुख नौशाद खान यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य क्रिकेटला समर्पित केले आहे. नौशाद यांचे स्वप्न भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे होते, पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

इतकेच काय तर नौशाद यांना मुंबईकडून एकही रणजी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. होय, ते अनेकदा मुंबई रणजी संघाच्या संभाव्य खेळाडूंमध्ये असायचे.

यानंतर त्यांनी ठरवले की मला देशासाठी खेळता आले नाही तरी मी माझ्या दोन्ही मुलांना असे घडवणार की ते एक दिवस देशासाठी नक्कीच खेळतील.

सध्या नौशाद यांचा मोठा मुलगा सर्फराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करतोय. तर धाकटा मुलगा मुशीर आता 19 वर्षांखालील एशिया कपमध्ये भारताकडून पदार्पण करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT