Brian Lara: 'जे म्हणतायेत की विराट सचिनच्या 100 शतकांचा रेकॉर्ड मोडेल, त्यांनी...', लाराने स्पष्टच सांगितलं

Virat Kohli: लाराने सचिनचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडणे विराटसाठी खूप कठीण असल्याचे म्हणत त्यामागील कारणही स्पष्ट केले आहे.
Brain Lara | Sachin Tendulkar | Virat Kohli
Brain Lara | Sachin Tendulkar | Virat KohliX

Brian Lara reacted on Can Virat Kohli break Sachin Tendulkar's 100 international centuries record?

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेक मोठे विक्रम पूर्ण केले आहेत. त्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी 15 नोव्हेंबर रोजी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळताना शतक केले होते. या शतकासह त्याने सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकाच्या विक्रमाला मागे टाकले होते.

विराटने न्यूझीलंडविरुद्ध 15 नोव्हेंबर रोजी केलेले 50 वे वनडे शतक होते. तो 50 वनडे शतके करणारा जगातील पहिलाच फलंदाज आहे. दरम्यान हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 80 वे शतक होते.

त्यामुळे आता तो सचिन तेंडुलकरचा 100 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विश्वविक्रमापर्यंत पोहचणार का, याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. याबद्दल वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंजाद ब्रायन लाराने प्रतिक्रिया दिली आहे.

Brain Lara | Sachin Tendulkar | Virat Kohli
Virat Kohli: 'तेव्हा पाय धरले, मनाचा ठाव घेतला अन् आता विराट...' 50 व्या शतकानंतर सचिनकडून तोंडभरून कौतुक

लाराने म्हटले आहे की सचिनचा विक्रम मोडणे अत्यंत कठीण आहे. आनंदबाजार पत्रिकाशी (एबीपी) बोलताना लारा म्हणाला, 'विराट किती वर्षांचा आहे? 35, बरोबर? त्याचे 80 शतके आहेत आणि त्याला अजून 20 शतकांची गरज आहे.'

'जर त्याने प्रत्येक वर्षाला 5 शतके केली, तर तरी त्याला अजून चार वर्षे तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी लागतील. त्यावेळी विराट 39 वर्षांचा असेल. खुप कठीण आहे, खुप खुप कठीण आहे.'

लारा पुढे म्हणाला, 'ठामपणे सांगता येत नाही, कोणीच सांगू शकत नाही. जे म्हणत आहेत की विराट तेंडुलकरच्या 100 शतकांचा विक्रम मोडेल, ते क्रिकेटच्या लॉजिकचा यात विचार करत नाहीयेत.'

'20 शतके करण्यासाठी बराच वेळ लागतो. अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतही इतकी शतके केलेली नाहीत. मी उगीचच साहस करणार नाही आणि म्हणणार नाही की विराट ते करेल.'

Brain Lara | Sachin Tendulkar | Virat Kohli
Virat Kohli: 'माझी पत्नी, माझा हिरो समोर बसलेत आणि...', 50 व्या वनडे शतकानंतर विराटच्या भावना व्यक्त

लाराने म्हटले की वय ही समस्या नाही. तो म्हणाला, 'वय कोणालाही थांबवत नाही. विराट अनेक विक्रम मोडेल, पण 100 शतकांचा विक्रम मला कठीण वाटत आहे. माझ्या शुभेच्छा त्याच्याबरोबर आहेतच. त्याने जर तेंडुलकरप्रमाणे १०० शतके केली, तर मला आनंदच होईल. सचिन माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे मी विराटचा मोठा चाहता आहे.'

विराटने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वनडेत 50 शतके, कसोटीत 29 शतके आणि टी20 मध्ये एक शतक केले आहे, असे त्याने एकूण 80 शतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com