Hardik Pandya handed over the trophy to Shivam Mavi and Jitesh Sharma
Hardik Pandya handed over the trophy to Shivam Mavi and Jitesh Sharma Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: 'कॅप्टन' पंड्याने चालू ठेवली परंपरा! मालिका विजयानंतरच्या कृतीने जिंकली मनं

Pranali Kodre

India vs Sri Lanka T20I series: भारत विरुद्ध श्रीलंका संघात शनिवारी टी20 मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने 91 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयानंतर हार्दिक पंड्याने केलेल्या कृतीने अनेकांची मने जिंकली आहेत.

पंड्याची मन जिंकणारी कृती

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिकने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे मालिका विजयाची ट्रॉफी त्याच्याकडे सोपवण्यात आली. पण पंड्याने नंतर ती ट्रॉफी संघात पहिल्यांदाच निवड झालेल्या जितेश शर्मा आणि शिवम मावीकडे सोपवली. त्यानंतर या दोघांनी ती ट्रॉफी उंचावली आणि भारतीय संघाने विजयाचा जल्लोष केला.

दरम्यान, भारतीय कर्णधाराने मालिका विजयाची ट्रॉफी संघाची नव्या किंवा युवा खेळाडूच्या हातात सोपवणे ही परंपरा गेल्या अनेक काळापासून सुरू आहे. यापूर्वी एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा हे देखील कर्णधार असताना संघातील युवा खेळाडूंकडे ट्रॉफी सोपवताना दिसले आहेत.

(Hardik Pandya handed over the trophy to Shivam Mavi and Jitesh Sharma)

मावीची पदार्पणात प्रभावी कामगिरी

मावीने याच मालिकेतील पहिल्या सामन्यातून भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच 22 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत सर्वोत्तम कामगिरी करणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही ठरलेला.

सॅमसनच्या जागेवर जितेशची निवड

पहिल्या सामन्यानंतर संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे जितेश शर्माची भारतीय संघात निवड झाली होती. पण त्याला अंतिम 11 जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण तो भारतीय संघात स्थान मिळवणारा विदर्भाचा तिसराच खेळाडू ठरला होता.

भारताचा मालिका विजय

भारताने अटीतटीचा झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंकेला केवळ 2 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने १६ धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. पण तिसऱ्या आणि निर्णायक टी20 सामन्यात भारताने 91 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत विजय मिळवला.

या मालिकेत 117 धावा आणि 3 विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेलला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa Today's Live News Update: फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

SC ने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT