India vs Sri Lanka: 'या' खेळाडूची कारकीर्द टी-20 मालिकेने संपली! 'टीम इंडियासाठी बनला खलनायक

India vs Sri Lanka, T20: टीम इंडियाच्या फ्लॉप खेळाडूची टी-20 कारकीर्द श्रीलंकेविरुद्धच्या सध्याच्या टी-20 मालिकेने संपत असल्याचे दिसते.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Sri Lanka, T20: टीम इंडियाच्या फ्लॉप खेळाडूची टी-20 कारकीर्द श्रीलंकेविरुद्धच्या सध्याच्या टी-20 मालिकेने संपत असल्याचे दिसत आहे. आपल्या फ्लॉप कामगिरीमुळे हा खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठा खलनायक ठरला. बहुतेक क्रिकेट चाहत्यांना हा खेळाडू टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर हवा आहे, कारण बहुतेक प्रसंगी हा खेळाडू भारतीय संघासाठी खलनायक ठरला आहे. या खेळाडूला संधी देऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचे काम कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केले आहे.

या खेळाडूची कारकीर्द श्रीलंका टी-20 मालिकेने संपली!

श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) या सध्याच्या टी-20 मालिकेमुळे टीम इंडियाच्या फ्लॉप खेळाडूची टी-20 कारकीर्द आता जवळपास संपलेली दिसत आहे. टीम इंडियाच्या या फ्लॉप खेळाडूने श्रीलंकेविरुद्धच्या सध्याच्या T20 मालिकेतील दोन सामन्यांमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली आहे. पहिल्या T20 सामन्यात या खेळाडूने टीम इंडियाला मॅच हरवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यातही या खेळाडूची कामगिरी अतिशय सामान्य राहिली. अशा परिस्थितीत हा खेळाडू टीम इंडियासाठी नासूर बनला आहे.

Team India
India vs Sri Lanka: 'नो-बॉल टाकणे गुन्हाच...', पराभवानंतर भडकला कॅप्टन पंड्या

टीम इंडियासाठी खलनायक ठरला

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात यजुवेंद्र चहलने 4 षटकात गोलंदाजी करत 30 धावा दिल्या. या काळात चहलला एकच विकेट मिळाली असली तरी त्याचा मोठा फायदा टीम इंडियाला झाला नाही. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतासमोर 206 धावा केल्या होत्या. टीम इंडिया (Team India) नंतर हा सामना 16 धावांनी हरली.

Team India
India vs Sri Lanka: 6,6,6,... अन् अक्षरने वाढवलं श्रीलंकन टीमचं टेन्शन, पाहा व्हिडिओ

दुसरीकडे, पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चहलने 2 षटकात 26 धावा दिल्या. यादरम्यान त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. चहलचा इकॉनॉमी रेटही 13.00 होता. गेल्या 12 टी-20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये त्याने केवळ 11 विकेट्स घेतल्या आहेत, तर 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असे घडले आहे की, चहलला एकही विकेट घेता आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com