India vs Sri Lanka 3rd T20 Match: LIVE मॅचमध्येच 'या' खेळाडूचा सुटला संयम! आऊट होताच...

IND vs SL 3rd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.
Rahul Tripathi
Rahul TripathiDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Sri Lanka 3rd T20 Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तो ही योग्य ठरला. पण टीम इंडियाच्या इनिंगदरम्यान एक फलंदाज आपली विकेट गमावल्यानंतर खूपच दु:खी दिसून आला. या खेळाडूने मैदानातच आपला राग व्यक्त केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या फलंदाजाने मैदानातच राग व्यक्त केला

या सामन्यात टीम इंडियाची (Team India) सुरुवात खराब झाली होती, टीम इंडियाने पहिली विकेट 3 धावांवर गमावली. यानंतर राहुल त्रिपाठी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला आला. राहुलने तुफानी फलंदाजी करताना अनेक मोठे फटके खेळले, पण 16 चेंडूत 35 धावा केल्यानंतर त्याने आपली विकेट गमावली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. विकेट गमावल्यानंतर मैदानातच राहुल संतापलेला दिसून आला.

Rahul Tripathi
India Vs Sri Lanka: मालिका जिंकण्यासाठी पांड्या पलटन सज्ज, तिसर्‍या T20 मध्ये अशी असेल Playing 11

चमिका करुणारत्नेने राहुलला बाद केले

चमिका करुणारत्नेने राहुलला बाद केले. राहुलने करुणारत्नेच्या गोलंदाजीवर दिलशान मदुशंकाच्या हाती कॅच दिला. यानंतर तो खूप संतापलेला दिसून आला. पॅव्हेलियनकडे जाताना त्याने आपला राग व्यक्त केला. राहुल त्रिपाठीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वयाच्या 31 व्या वर्षी पदार्पण

31 वर्षीय राहुल त्रिपाठीला या मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान पदार्पण सामना खेळण्याची संधी मिळाली. तो आयपीएल 2022 पासून टीम इंडियाचा भाग आहे, परंतु या मालिकेपूर्वी तो भारतासाठी (India) एकही सामना खेळू शकला नाही. राहुल त्रिपाठी पदार्पणाच्या सामन्यात फ्लॉप ठरला असला तरी. त्या सामन्यात 5 चेंडूत 5 धावा करुन तो बाद झाला.

Rahul Tripathi
India vs Sri Lanka: 6,6,6,... अन् अक्षरने वाढवलं श्रीलंकन टीमचं टेन्शन, पाहा व्हिडिओ

टीम इंडियाने 228 धावा केल्या

मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या. या डावात सूर्यकुमार यादव हा भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 51 चेंडूंचा सामना करत नाबाद 112 धावा केल्या. या शतकी खेळीत सूर्यकुमार यादवने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. सूर्यकुमारशिवाय अक्षर पटेलने 9 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com