India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

India vs Pakistan: टीम इंडियाचाच 'पंच'! गेल्या 5 टी-20 सामन्यांत पाकडे चारी मुंड्या चीत; पाहा Head To Head रेकॉर्ड

India vs Pakistan Head To Head : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा थरार म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Sameer Amunekar

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा थरार म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि सलमान अली आगाचा पाकिस्तानी संघ आमनेसामने येतील. या महामुकाबल्यापूर्वी दोन्ही संघांतील टी२० रेकॉर्ड्स पाहता, भारतीय संघाने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्याचे दिसून येत आहे.

टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास: टीम इंडियाच 'किंग'

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० संघर्षाला २००७ च्या विश्वचषकापासून सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे खेळला गेलेला पहिलाच सामना 'टाय' झाला होता, ज्याचा निकाल 'बॉल आऊट'द्वारे लागला आणि भारताने विजय मिळवला. तेव्हापासून आतापर्यंत या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये एकूण १६ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने तब्बल १३ सामन्यांत बाजी मारली आहे, तर पाकिस्तानला केवळ ३ वेळाच विजयाचा गुलाल उधळता आला आहे. ही आकडेवारी भारतीय संघाचा दबदबा सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे.

गेल्या ५ सामन्यांत पाकिस्तानची पाटी कोरीच!

जर आपण गेल्या पाच टी२० सामन्यांच्या निकालावर नजर टाकली, तर पाकिस्तानची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या पाचही सामन्यांत भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे.

  • आशिया चषक २०२५ (दुबई): या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग तीनदा पराभव केला. ग्रुप स्टेजमध्ये ७ विकेट्सनी, सुपर-४ मध्ये ६ विकेट्सनी आणि फायनलमध्ये ५ विकेट्सनी विजय मिळवून भारताने जेतेपद पटकावले.

  • टी२० विश्वचषक २०२४ (न्यूयॉर्क): अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ धावांनी थरारक विजय मिळवला होता.

  • टी२० विश्वचषक २०२२ (मेलबर्न): विराट कोहलीच्या त्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर भारताने ४ गडी राखून पाकिस्तानला पराभूत केले होते.

पाकिस्तानचा शेवटचा विजय कधी?

पाकिस्तानला भारतावर टी२० मध्ये शेवटचा विजय मिळवून आता बराच काळ लोटला आहे. आशिया चषक २०२२ मध्ये पाकिस्तानने भारताला ५ विकेट्सनी हरवले होते. त्यानंतर सलग तीन वर्षे आणि पाच महत्त्वाच्या सामन्यांत पाकिस्तानला भारताचा बचाव भेदता आलेला नाही. आगामी रविवारी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान हा पराभवाचा फेरा मोडणार की सूर्यकुमारची सेना विजयाचा 'सिक्सर' मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

संपादकीय: शाबासकीच्या पलीकडे...

मुलांच्या खांद्यावर बंदुका नकोत! शिक्षकांवरील प्रेमाचा आदर करा, पण विद्यार्थ्यांना आंदोलनाचे हत्यार बनवू नका

SCROLL FOR NEXT