Goa Temple Theft: वेेरेत मंदिराची काैले काढून चोरांनी फंडपेटी केली लंपास, चौघा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार

Temple Theft: आंबेखणवाडो, वेरे, बार्देश येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील फंडपेटी फोडून चोरांनी अंदाजे ३० हजारांची रोख रक्कम लंपास केली.
Goa Temple Theft
Goa Temple TheftDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: आंबेखणवाडो, वेरे, बार्देश येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील फंडपेटी फोडून चोरांनी अंदाजे ३० हजारांची रोख रक्कम लंपास केली. मंदिराच्या छताची कौले काढून चोरांनी ही चोरी केली. चोरीची घटना बुधवारी पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान घडली.

या प्रकरणी देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद धुंगट यांनी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा नोंद केला. मंदिराच्या आवारात राहणाऱ्या पुरोहीतांनी नेहमीप्रमाणे मंदिराचा दरवाजा उघडला, तेव्हा हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

Goa Temple Theft
Leopard In Goa: डिचोलीत बिबट्याची दहशत, भर लोकवस्तीत वावर; विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांच्या जीवाला धोका

नंतर त्यांनी देवस्थानचे पदाधिकारी व पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अनोळखी चारजण चोर हे मंदिराच्या प्रांगणात मागील बाजूने उभारलेल्या पत्र्यांच्या शेडच्या लोखंडी खांबवरून हे चोर मंदिराच्या छतावर चढले. छप्पराची कौले काढून ते आतमध्ये शिरले. गर्भकुडी बाहेर असलेली फंडपेटीचा कुलूप त्यांनी लोखंडी हुक घालून तोडले आणि आतील सर्व रक्कम चोरून नेली.

Goa Temple Theft
Goa Matrimonial Fraud: मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार शोधणं पडलं महागात; 'लंडन'च्या भामट्याकडून चिंबलच्या महिलेला 'इतक्या' लाखांचा गंडा!

gया घटनेची माहिती मिळताच साळगाव पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर, उपनिरीक्षक सर्वेश भंडारी, निशान नाईक यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करत पंचनामा केला. पोलिसांकडून ठशे व श्वान पथकाचा वापर करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com