Goa Tourist Assault: आगोंद किनाऱ्यावर दिवसाढवळ्या राडा! परदेशी महिला पर्यटकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण; 22 वर्षीय रोहनला बेड्या

Rohan Velip Arrested: झेक प्रजासत्ताकमधून गोव्यात आलेल्या एका महिला पर्यटकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या.
Goa Tourist Assault
Goa Tourist AssaultDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दक्षिण गोव्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. झेक प्रजासत्ताकमधून गोव्यात आलेल्या एका महिला पर्यटकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या. ही संतापजनक घटना 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:15 च्या सुमारास अगोंद किनाऱ्यावर घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, गोव्यातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी आणि परदेशी महिला यांच्यात काही कारणावरुन वादावादी झाली. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच न थांबता, त्याने रागाच्या भरात तिथे पडलेला एक दगड उचलून महिलेला जोराने मारला, ज्यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली. 10 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी काणकोण पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 117-2 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

Goa Tourist Assault
Goa Crime: अबब! गोव्यात पकडले 5.91 कोटींचे ड्रग्ज; 5 विदेशींसह एकूण 27 जणांना अटक

सुरुवातीला पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, कारण आरोपीची (Accused) ओळख पटलेली नव्हती आणि पीडित महिलेने दिलेले वर्णनही पुसटसे होते. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकारी निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने तपास सुरु केला. गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. अखेर बुधवारी (11 फेब्रुवारी) पोलिसांनी रोहन वेळीप या 22 वर्षीय तरुणाला अटक केली. रोहन हा केपे तालुक्यातील रहिवासी आहे.

Goa Tourist Assault
Goa Crime: कोयता-दांडक्याने मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी, जखमी अवस्थेत केली तक्रार; पुराव्याअभावी दाम्पत्य निर्दोष

पोलीस कोठडीत असताना केलेल्या चौकशीत रोहनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, त्या दिवशी नक्की कोणत्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि परिस्थिती इतकी गंभीर का बनली, याचा तपास अजूनही सुरु आहे. गोव्यासारख्या (Goa) आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळावर दिवसाढवळ्या परदेशी महिलेला अशा प्रकारे मारहाण झाल्यामुळे पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com