rashid latif Dainik Gomantak
क्रीडा

IND VS PAK: "सामना रद्द होणार नाही, उलट..." भारत-पाक सामन्याचं पडद्यामागचं सत्य काय? माजी पाक कर्णधाराचा खळबळजनक दावा

Rashid Latif Statement: पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि दिलासादायक वक्तव्य केले आहे.

Manish Jadhav

T20 World Cup 2026 Boycott Controversy: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यावर अनिश्चिततेचे सावट असून क्रिकेट विश्वात सध्या एकाच विषयाची चर्चा रंगली आहे. पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या या महामुकाबल्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्याने क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

या निर्णयामुळे दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण असतानाच पाकिस्तानचे (Pakistan) माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि दिलासादायक वक्तव्य केले आहे. लतीफ यांच्या मते, पडद्यामागे काही वेगळ्याच घडामोडी घडत असून, 15 फेब्रुवारीला होणारा हा सामना कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, उलट दोन्ही संघ मैदानात एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील.

राशिद लतीफ यांनी एका मुलाखतीदरम्यान या प्रकरणातील 'इनसाइड स्टोरी' सांगताना स्पष्ट केले की, बहिष्कार टाकण्याचे वक्तव्य हे केवळ राजकीय दबावतंत्राचा भाग असू शकते. अंतिम निर्णय हा दिल्ली आणि इस्लामाबाद या दोन्ही देशांच्या केंद्र सरकारांच्या चर्चेनंतरच घेतला जाईल. लतीफ यांच्या मते, क्रिकेट आता केवळ खेळ उरला नसून तो एक मोठा व्यवसाय झाला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळणारा महसूल आणि व्यापारी हितसंबंध इतके मोठे आहेत की, कोणताही देश किंवा आयसीसी हा सामना गमावू इच्छित नाही. लतीफ यांनी पुढे असेही नमूद केले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख स्वतः एक मंत्री आहेत आणि बीसीसीआयचेही राजकीय धागेदोरे घट्ट आहेत, त्यामुळे राजकीय स्तरावर यावर नक्कीच काहीतरी तोडगा निघेल.

दुसरीकडे, आयसीसीने (ICC) या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चर्चेसाठी अधिकृतपणे पाचारण केले आहे. मात्र, अद्याप पीसीबीने या बहिष्काराबाबत आयसीसीला कोणताही औपचारिक ईमेल पाठवलेला नाही. पाकिस्तान बोर्ड सध्या आयसीसीशी बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याच्या बातम्या येत असल्या तरी, आंतरराष्ट्रीय दबाव आणि आर्थिक गणिते पाहता पाकिस्तानला नमते घ्यावे लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

आयसीसीने या वादावर मार्ग काढण्यासाठी बोर्ड सदस्यांची तातडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. जर हा सामना झाला नाही, तर टी20 वर्ल्ड कपच्या ब्रॉडकास्टर्सना आणि आयोजकांना कोट्यवधींचा फटका बसू शकतो, ज्यामुळे हा वाद येणाऱ्या काही दिवसांत अधिक चिघळण्याची शक्यता आहे, पण अखेर तडजोड होऊन सामना खेळवला जाईल, अशीच चिन्हे दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT