Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

Sarfaraz Khan India Test comeback: साई सुदर्शनला दुखापत झाली आणि मुंबईकर खेळाडू सर्फराझ खानसाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे उघडे करण्यात आले.
Sarfaraz Khan
Sarfaraz KhanDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: साई सुदर्शनला दुखापत झाली आणि मुंबईकर खेळाडू सर्फराझ खानसाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे उघडे करण्यात आले. भारत-श्रीलंका यांच्यामध्ये १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या सर्फराझ खानने गेल्या काही काळामध्ये अफाट परिश्रम करून आपली जागा निश्चित केली आहे. त्याने १७ किलो वजन घटवले असून काश्मीरमध्येही कसून सराव केला. याचे फळ आता त्याला मिळाले आहे.

सर्फराझ खानने मागील दीड वर्षांत स्वतःला भारतीय संघात बसवण्यासाठी शक्य ते सर्व केले आणि तब्बल १७ किलो वजन कमी केले. रणजी करंडकामध्ये दमदार त्रिशतक झळकावूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तो थोडा जड शरीरयष्टीचा आहे, अशी टीका त्याच्यावर होत होती. आता सर्फराज खान अधिक फिट आणि सडपातळ दिसतो. त्याचा फायदा त्याच्या टी-२० खेळालाही झाला आहे.

२०२४मधील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चार डाव अपयशी ठरल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. तो निर्णय स्वीकारणे त्याच्यासाठी कठीण होते. त्या मालिकेत संपूर्ण भारतीय संघ अपयशी ठरला होता; मात्र कारवाई केवळ २८ वर्षीय सर्फराज खानवर झाली. यानंतर तो इंग्लंडला गेला.

तिथे इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघाकडून त्याने ९२ धावा केल्या. तसेच बेकनहॅम येथे भारत आणि भारत अ संघातील सराव सामन्यात शतकही झळकावले. तरीही भारतीय संघात पुनरागमनाचे त्याचे स्वप्न दूरच होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा निराशाजनक पराभव झाल्यानंतर मात्र निवडकर्त्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या.

Sarfaraz Khan
Goa traffic issue: राज्यात वाहतुकीचा मास्टर प्लॅन गरजेचा

लाल मातीच्या खेळपट्ट्या

आयपीएलनंतर सर्फराज खान मुंबई टी-२० लीगमध्ये खेळला आणि आकाश टायगर्स वेस्टर्न मुंबई सबर्ब्सकडून काही आक्रमक खेळी केल्या; मात्र मुंबईत पावसाळा सुरू झाल्यानंतर तो काही काळासाठी काश्मीरला गेला.

Sarfaraz Khan
Goa Dhiryo ban: धीरयोला बंदी, तरी झुंजी सुरूच! वार्का व बाणावलीत प्रकारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

कौशल्य सुधारण्यासाठी त्याने काश्मीरमधील शेर-ए-कश्मीर स्टेडियममध्ये अनेक तास सराव केला. शिवाय, बीकेसी येथील एमसीएच्या इनडोअर सुविधेत ॲस्ट्रो-टर्फ विकेटवर कौशल्याचा सराव केला. तसेच कुर्ल्याजवळील खासगी सराव सुविधांमध्ये वापरलेल्या आणि नीट तयार न केलेल्या लाल मातीच्या खेळपट्ट्यांवर तासनतास फलंदाजी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com