

Chaturgrahi Yoga In Cancer August 2026: आज (11 ऑगस्ट) श्रावण शिवरात्रीच्या मुहूर्तावर अंतराळात एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक ग्रहांचा संयोग घडून आला. आज कर्क राशीत सूर्य, गुरु, बुध आणि चंद्र हे चार प्रमुख ग्रह एकत्र आले. यामुळे अत्यंत शुभ असा 'चतुर्ग्रही योग' निर्माण झाला. देवगुरु बृहस्पती आधीपासूनच कर्क राशीत उच्च अवस्थेत सूर्य आणि बुधासोबत विराजमान होते.
आज पहाटे 4 वाजून 42 मिनिटांनी चंद्राने स्वतःच्याच कर्क राशीत प्रवेश केल्यामुळे हा शक्तिशाली संयोग पूर्ण झाला. या चतुर्ग्रही योगासोबतच कर्क राशीत 'गजकेसरी' आणि 'बुधादित्य' सारखे अत्यंत राजेशाही योगही सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे ग्रहांचे एक अतिशय दमदार कॉम्बिनेशन तयार झाले आहे.
ज्योतिषाचार्यांच्या मते, एकाच राशीत अशा प्रकारे चार बलवान ग्रहांची युती होणे ही एक विलक्षण खगोलीय घटना आहे. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार असला, तरी मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन या 4 राशींसाठी हा काळ प्रचंड भाग्यवान आणि सुवर्णकाळ ठरणार आहे. या राशीच्या जातकांकडे चहुबाजूंनी पैसा खेचला जाण्याचे योग असून, करिअरमध्ये मोठा ब्रेक आणि मान-सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे.
मेष राशीच्या जातकांसाठी हा चतुर्ग्रही योग करिअरला नवीन दिशा देणारा ठरेल. नोकरीत नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील, तसेच वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे झाल्यामुळे अडकलेला पैसा परत मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दुसरीकडे, कर्क राशीमध्येच हा योग तयार होत असल्याने या जातकांचा आत्मविश्वास गगनाला भिडेल. नोकरीत प्रमोशनचा (Promotion) योग असून व्यवसायात नवीन भागीदार किंवा मोठे क्लायंट मिळतील. एकापेक्षा जास्त माध्यमातून कमाई सुरु झाल्याने तुमची आर्थिक बाजू कमालीची मजबूत होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्याची भक्कम साथ घेऊन आला आहे. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेली कामे अचानक वेगाने पूर्ण होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर नामांकित कंपनीकडून उत्तम ऑफर मिळू शकते. परदेशातून किंवा इतर शहरांतून व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मीन राशीच्या जातकांसाठी हा योग ज्ञान, बुद्धी आणि सर्जनशीलता वाढवणारा ठरेल. विशेषतः विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळेल. कला आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांना नवीन प्रोजेक्ट्स मिळतील, तसेच प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क आल्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मोठ्या प्रमाणावर वाढेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.