IND VS PAK: मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा! वैभव सूर्यवंशी पाकिस्तानच्या फलंदाजावर भडकला; उपकर्णधाराला करावा लागला हस्तक्षेप VIDEO

Vaibhav Suryavanshi vs Pakistan Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे नाते केवळ सीमा किंवा राजकारणापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते आता मैदानावरही अत्यंत टोकाचे स्वरूप धारण करत आहे.
Vaibhav Suryavanshi Angry
Vaibhav Suryavanshi AngryDainik Gomantak
Published on
Updated on

Cricket Viral Video : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे नाते केवळ सीमा किंवा राजकारणापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते आता मैदानावरही अत्यंत टोकाचे स्वरूप धारण करत आहे. झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या अंडर-१९ विश्वचषक २०२६ मध्ये सुपर-६ फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५८ धावांनी धुव्वा उडवला. मात्र, भारताच्या या विजयापेक्षा सध्या चर्चा रंगली आहे ती भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि पाकिस्तानी खेळाडू यांच्यातील झालेल्या जोरदार वादाची.

नेमकी काय घडली घटना?

पाकिस्तानच्या डावातील ३७ व्या षटकात हा प्रकार घडला. भारतीय संघाचा उपकर्णधार विहान मल्होत्राने पाकिस्तानचा फलंदाज अली हसन बलोचला बाद केले. हा पाकिस्तानचा सहावा बळी होता आणि तिथूनच त्यांची हार निश्चित झाली होती.

विहान आपल्या यशाचे जल्लोषात साजरे करत असतानाच, जवळच उभ्या असलेल्या वैभव सूर्यवंशीने रागाच्या भरात बाद झालेल्या पाकिस्तानी फलंदाजाच्या दिशेने चाल केली. वैभव काहीतरी बोलत पाकिस्तानी खेळाडूच्या अंगावर धावून जात असल्याचे पाहून मैदानावर तणाव निर्माण झाला.

उपकर्णधाराचा मध्यस्थीचा प्रयत्न

वैभवचा राग इतका अनावर झाला होता की, विहान मल्होत्राला आपले सेलिब्रेशन सोडून मध्ये पडावे लागले. विहानने वैभवला पकडून बाजूला नेले आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. जर विहानने वेळीच हस्तक्षेप केला नसता, तर या वादाचे पर्यवसान मोठ्या संघर्षात झाले असते. भारतीय संघातील इतर खेळाडूंनीही वैभवला शांत केले, मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Vaibhav Suryavanshi Angry
IPL In Goa: गोव्यात होणार 'आयपीएल' सामने! वेर्ण्यातील 1919 स्टेडियम होणार क्रिकेट हब; कमलप्रसाद यादवांनी व्यक्त केला मानस

वैभव सूर्यवंशी आणि पाकिस्तानी खेळाडू यांच्यातील हा संघर्ष नवीन नाही. यापूर्वी डिसेंबरमध्ये झालेल्या अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेतही वैभव फलंदाजी करत असताना पाकिस्तानी खेळाडूंकडून त्याला सतत स्लेजिंग करण्यात येत होती. 'एशिया कप रायझिंग स्टार्स' स्पर्धेतही अशाच प्रकारची चकमक पाहायला मिळाली होती. वारंवार होणाऱ्या या स्लेजिंगमुळेच वैभवचा संयम सुटला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Vaibhav Suryavanshi Angry
Goa Crime: गोवा हादरला! 'बिट्स पिलानी'त 20 वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेत संपवलं जीवन, पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश

मैदानावर वादाची ठिणगी पडली असली तरी, टीम इंडियाने खेळावर आपले लक्ष केंद्रित केले होते. या विजयासह भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढत उपांत्य फेरीत (सेमीफायनल) आपली जागा निश्चित केली आहे. टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्काराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, ज्युनियर स्तरावरील हा विजय भारतीय चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com