Team India Possible Playing 11 Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: बुमराह IN, रेड्डी OUT! पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11, गिल-गंभीर घेणार मोठा निर्णय?

Team India Possible Playing 11: भारत-न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला गुरुवारपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात होत असून, मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर आता टीम इंडिया कसोटी मालिकेतही आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी सज्ज झाली.

Manish Jadhav

Team India Possible Playing 11: भारत-न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला गुरुवारपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात होत असून, मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर आता टीम इंडिया कसोटी मालिकेतही आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी सज्ज झाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी भारतासाठी ही दोन सामन्यांची मालिका अत्यंत महत्त्वाची असून, फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला हे दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे.

वेलिंग्टन येथे खेळल्या जाणाऱ्या या पहिल्या कसोटी सामन्याच्या पिचवर वेगवान गोलंदाजांना मोठी मदत मिळण्याची दाट शक्यता आहे, तसेच येथील हवामानाचा अंदाज घेता चेंडूला चांगला स्विंग मिळू शकतो. यामुळेच कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी चार प्रमुख वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर नजर टाकल्यास, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करताना दिसतील, तर अलीकडेच इंडिया 'अ' कडून अप्रतिम कामगिरी करणारा देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरु शकतो. मधल्या फळीत स्वतः कर्णधार शुभमन गिल, आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल संघाची धुरा सांभाळतील. अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाचा समावेश करण्यात आला असून, कंडिशननुसार अंशुल कंबोज देखील फलंदाजीत मोलाची भर घालू शकतो. गोलंदाजी आक्रमणात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे तीन अनुभवी वेगवान शिलेदार न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर तगडे आव्हान उभे करतील.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अंशुल कंबोज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Sexual Assault Case: म्हापसा अत्याचार प्रकरणात तपासाचे मोठे आव्हान; भाषेचा अडसर, पुरावे गोळा करण्याची कसोटी

Blue Flag Award 2026: गोव्याच्या एकाही बीचला ब्ल्यू फ्लॅग मानांकन नाही; महाराष्ट्राचे 3 समुद्रकिनारे चमकले

Goa Politics: 'राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्या'; गिरीश चोडणकरांचा भाजपवर हल्लाबोल

Goa Politics: गोवा फॉरवर्ड-काँग्रेस जागावाटपाचा फैसला पुढील आठवड्यात! काँग्रेस कमकुवत असलेल्या जागांवर सरदेसाईंचा दावा

WhatsApp PF Balance Check 2026: पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

SCROLL FOR NEXT