

मडगाव: गोवा फॉरवर्ड व काँग्रेस या दोन्ही पक्षात युतीची बोलणी सुरू झाली असली तरी अद्याप जागा वाटपाबद्दल कुठलाही निर्णय झालेला नाही. येत्या आठवड्यात यासंबंधी बोलणी होऊन गोवा फॉरवर्डला किती जागा सोडायच्या हे निश्चित होणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. ज्या मतदारसंघात काँग्रेस कमकुवत आहे आणि गोवा फॉरवर्ड जिंकू शकतो अशा मतदारसंघावर पक्ष दावा करणार, अशी माहिती गोवा फॉरवर्डच्या गोटातून प्राप्त झाली आहे.
दरम्यान, यासंदर्भात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज आपल्या पक्षाची रणनिती निश्चिचित केलीया असून कुठल्या मतदारसंघात गोवा फॉरवर्ड जिंकणे शक्य आहे याचा अंदाज घेतला आहे. काही नेत्यांना घेऊन पुढे जाण्याची आमची तयारी आहे. फातोर्डा मतदारसंघात आपण दारोदार जाऊन प्रचार करण्याच्या मोहिमेला सुरुवात केल्याचे सांगितले.
'उमेदवार आत्ताच ठरवा'
कुठल्याही मतदारसंघात जास्त इच्छुक असल्यास त्याचा फायदा भाजपाला कसा होतो हे मागील निवडणुकीत नावेली मतदारसंघात दिसून आले होते, अशी स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी सर्व मतदारसंघातील युतीचे उमेदवार कोण असणार हे आत्ताच ठरविण्याची गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाला आम्ही त्याची कल्पना दिलेली आहे, असे सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.