Goa Politics: 'टीका नको, राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरे द्या'; गिरीश चोडणकरांचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi Questions: काँग्रेसकडून मोर्चे, आंदोलने काढली जातात, त्‍यावर पोलिस दडपशाहीचा अवलंब करतात, परंतु भाजपची मंगळवारची पदयात्रा मात्र पोलिस संरक्षणात निघाली
Rahul Gandhi Questions
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘‘काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपल्‍या अधिकारांनुसारच सत्ताधारी भाजपला प्रश्‍‍न विचारत आहेत, परंतु त्‍यांच्‍या प्रश्‍‍नांना उत्तरे देण्‍याऐवजी भाजप नेते त्‍यांच्‍यावरच टीका करीत लोकशाही वाचवण्‍यासाठी पदयात्रा काढत आहेत.

अशाने लोकशाही चालत नाही’’, असे काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्‍हणाले. ‘‘भाजपकडून अजूनही गांधी घराण्‍याचा संदर्भ देत घराणेशाहीवर टीकास्र सोडले जात आहे, परंतु गांधी घराणे वगळून अटलबिहारी वायपेयी, देवेगौडा आदींसारखे नेते पंतप्रधान झालेले आहेत. काँग्रेसने लोकशाही सांभाळली म्‍हणूनच चहा विकणारी व्‍यक्ती देशाचा पंतप्रधान बनू शकली’’, असे चोडणकर म्‍हणाले.

Rahul Gandhi Questions
Goa Politics: गोवा फॉरवर्ड-काँग्रेस जागावाटपाचा फैसला पुढील आठवड्यात! काँग्रेस कमकुवत असलेल्या जागांवर सरदेसाईंचा दावा

‘‘काँग्रेसकडून मोर्चे, आंदोलने काढली जातात, त्‍यावर पोलिस दडपशाहीचा अवलंब करतात, परंतु भाजपची मंगळवारची पदयात्रा मात्र पोलिस संरक्षणात निघाली. गोवा पोलिसांकडून जाणीवपूर्वक असा भेदभाव केला जात असल्‍याने त्‍यांचा आपण निषेध व्‍यक्त करतो’’, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Amit Shah praises PM Modi's development work
Rahul Gandhi Ramlila Maidan Rally 2026
Will Rahul Gandhi visit Bhausaheb Bandodkar Samadhi
Rahul Gandhi 2029 election plan