

Team India Bilateral Series Before World Cup 2027: आगामी विश्वचषक 2027च्या रणधुमाळीची आतापासूनच जोरदार तयारी सुरु झाली असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या महामुकाबल्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदा एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडिया आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात 7 ऑक्टोबर रोजी केपटाऊन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार असून, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी क्रिकेट विश्वातील सर्वात रोमहर्षक मानला जाणारा भारत-पाकिस्तान महामुकाबला होणार आहे.
मागच्या वेळी विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचे शल्य उराशी बाळगून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघ व्यवस्थापन यंदा तयारीमध्ये कोणतीही कसर सोडण्याच्या मनस्थितीत नाही. या मोठ्या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा (Team India) आगामी काळातील आंतरराष्ट्रीय दौरा अत्यंत व्यस्त आणि आव्हानात्मक असणार आहे. आगामी 22 ऑक्टोबरपासून टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा सुरु होत आहे, ज्याची सुरुवात पाच टी-20 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर पाच रोमांचक एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होईल.
यादरम्यान 4 नोव्हेंबर रोजी पहिला वनडे सामना रंगेल, जो आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय खेळाडूंसाठी अत्यंत कसोटीचा ठरणार आहे. किवी संघाविरुद्धच्या या मालिकेनंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे, जे 13, 16 आणि 19 डिसेंबर रोजी पार पडतील.
याशिवाय, पुढील वर्षी जानेवारी महिन्यात म्हणजेच 3, 6 आणि 9 जानेवारी रोजी टीम इंडिया जिम्बाब्वेविरुद्ध भारतामध्येच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षी 18 जून ते 4 जुलै दरम्यान होणारी आशिया कप स्पर्धा देखील 50 षटकांच्या फॉरमॅटमध्येच खेळवली जाणार आहे, ज्यामुळे विश्वचषकाच्या दृष्टीने सर्व संघांना योग्य सराव मिळणार आहे.
द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, विश्वचषक 2027च्या सुरुवातीला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यासोबतच मुख्य स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिका दौरयावर 6 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाण्याची शक्यता आहे. हे सामने जोहान्सबर्ग, केपटाऊन आणि सेंचुरियन सारख्या त्याच ऐतिहासिक मैदानांवर खेळवले जातील, जिथे विश्वचषकाचे मुख्य सामने होणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.