Child Sexual Assault Case: म्हापसा अत्याचार प्रकरणात तपासाचे मोठे आव्हान; भाषेचा अडसर, पुरावे गोळा करण्याची कसोटी

POCSO Case: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित पुंडलिक गुडगे हा केवळ कन्नड भाषिक असून त्याला दुसरी कोणतीही भाषा येत नाही.
POCSO Case
Child Sexual Assault CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: दिवाळीच्या रात्री म्हापसा बाजारपेठेतील एका निर्जन इमारतीत तीन ते चार वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित पुंडलिक गुडगे (२८, रा. म्हापसा, मूळ कर्नाटक) याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने सोमवारी आणखी ४ दिवसांची वाढ केली आहे.

या प्रकरणातील तपासात पोलिसांसमोर आता काही महत्त्वाची कायदेशीर आणि तांत्रिक आव्हाने उभी राहिली असून, गुन्हा सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे गोळा करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित पुंडलिक गुडगे हा केवळ कन्नड भाषिक असून त्याला दुसरी कोणतीही भाषा येत नाही. चौकशीदरम्यान तो कन्नडमध्ये बोलत असल्याने त्याचे म्हणणे पोलिसांना कसे समजते, हा प्रश्‍न समोर येत आहेत.

POCSO Case
Goa Politics: 'राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्या'; गिरीश चोडणकरांचा भाजपवर हल्लाबोल

अशावेळी दुभाषकाची (भाषांतरकाराची) नितांत गरज असताना अद्याप त्याची योग्य व्यवस्था आहे की नाही यावरदेखील अजून स्‍पष्‍टता नसल्‍याची माहिती मिळाली आहे. घटनेच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित पीडित मुलीला गल्लीत घेऊन जाताना दिसत असल्याच्या आधारावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्‍याला इतर भाषा येत नसल्‍याने नियमानुसार अटक करताना त्याला अटकेचे नेमके काय कारण देण्यात आले, हादेखील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार, एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना किंवा नातेवाईकांना त्याबाबत कळविणे बंधनकारक असते.

पोलिसांनी संशयिताच्या नातेवाईकांना माहिती दिल्याचा दावा केला असला, तरी तो अधिकृतरीत्या सिद्ध करावा लागेल. संशयित केवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलीसोबत दिसला, या एकाच आधारावर न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. त्यानेच हा अत्याचार केला आहे, हे कायद्याच्या कसोटीवर सिद्ध व्‍हावे लागेल. त्‍यासाठी फॉरेन्सिक अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांची अचूक जुळवाजुळव करणे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.

‘त्या’ दिवशी नेमके काय घडले?

रविवार, ८ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या सायंकाळी पीडित बालिका कुटुंबासह म्हापसा येथील लोहिया उद्यान व टॅक्सी स्टँड परिसरात फुगे विक्रीसाठी आली होती. यावेळी तिच्या वडिलांचे काही परिचितांशी भांडण सुरू झाले. या गोंधळाचा फायदा घेत संशयिताने चिमुरडीला जवळच्या निर्जन इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

POCSO Case
Goa Politics: गोवा फॉरवर्ड-काँग्रेस जागावाटपाचा फैसला पुढील आठवड्यात! काँग्रेस कमकुवत असलेल्या जागांवर सरदेसाईंचा दावा

बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकून एका मोटरसायकल पायलटसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील बालिकेला तातडीने गोमेकॉत दाखल करण्यात आले. ९ नोव्हेंबरला म्हापसा पोलिसांनी ‘पोक्सो’सह विविध कायद्यांखाली गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीतून संशयिताची ओळख पटली.

घटनेनंतर फरार झालेल्या संशयिताचा पोलिसांनी ३६ तास शोध घेतला. अखेर ११ नोव्हेंबरला पणजीत त्याला अटक करण्यात आली. सुरवातीला पाच दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर १६ नोव्हेंबरला न्यायालयाने त्याच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.