Ravindra Jadeja
Ravindra Jadeja  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: जड्डू परत येतोय...! टीम इंडियासाठी कसोटी मालिकेपूर्वी आली गुडन्यूज

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. दरम्यान, या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा कसोटी मालिकेत खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे.

बीसीसीआयने यापूर्वीच जडेजाचा या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश केला होता. मात्र त्याच्या तंदुरुस्तीवर त्याची उपलब्धता अवलंबून असल्याचे सांगण्यात आले होते. आता त्याने त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली असल्याचे समजत आहे.

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार जडेजाला बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळण्याची परवानगी दिली आहे. बुधवारी एनसीएकडून त्याचा फिटनेस रिपोर्ट देण्यात आला होता, ज्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत खेळू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जडेजा यापूर्वी अखेरचा कसोटी सामना 1-5 जुलै 2022 दरम्यान बर्मिंगघममध्ये खेळला होता. तसेच भारताकडून तो 31 ऑगस्टला अखेरचा टी२० सामना खेळला. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर राहावे लागले. तो गेल्यावर्षी टी20 वर्ल्डकपही खेळू शकला नव्हता.

पण अखेर जवळपास सहा महिन्यांनी तो पूर्ण तंदुरुस्त झाला असून भारतासाठी खेळण्यास सज्ज आहे. जडेजाने नुकताच सौराष्ट्रकडून रणजी सामना खेळून त्याचा मॅच फिटनेसही सिद्ध केला आहे. त्याने या सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार असल्याने 2 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये भारतीय संघाचा सराव कॅम्प सुरू झाला आहे, असे रिपोर्ट्स समोर आले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूरला सुरु होणार आहे. 

त्यानंतर दुसरा कसोटी सामना 17 - 21 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीला होईल. तिसरा कसोटी सामना 1-5 मार्चदरम्यान धरमशाला आणि चौथा कसोटी सामना 9-13 मार्चदरम्यान अहमदाबादला होईल. या कसोटी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 17 ते 22 मार्च दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

SCROLL FOR NEXT