Ravi Bishnoi BCCI
क्रीडा

T20I Rankings: भारताचीच एकहाती सत्ता! सूर्यानंतर आता रवी बिश्नोईने पटकावला 'नंबर वन'चा ताज

Pranali Kodre

India spinner Ravi Bishnoi become Number one bowler on the latest ICC Men's T20I Player Rankings:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (6 डिसेंबर) ताजी टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या टी20 मालिकेनंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या क्रमवारीत भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईने मोठी झेप घेतली आहे.

23 वर्षीय रवी बिश्नोईने टी20 क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत केलेल्या कामहिरीचे बक्षीस मिळाले आहे.

रवी बिश्नोईने 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत 5 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या. तो या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही होता, तसेच त्याने या मालिकेतील मालिकावीर पुरस्कारही पटकावला होता.

आता या कामगिरीनंतर त्याते 699 रेटिंग गुण झाले आहेत. त्यामुळे त्याने अफगाणिस्तानच्या राशिद खानला मागे टाकत अव्वल क्रमांक पटाकवला आहे. राशिद आता 692 रेटिंग पाँइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

त्याचबरोबर वनिंदू हसरंगा आणि आदील राशिद संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे प्रत्येकी 679 रेटिंग पाँइंट्स आहेत. पाचव्या क्रमांकावर महिश तिक्षणा असून त्याचे 677 रेटिंग पाँइंट्स आहेत.

बिश्नोईची सातत्यपूर्ण कामगिरी

रवी बिश्नोईने फेब्रुवारी 2022 मध्ये वेस्ट इंडिदविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने आत्तापर्यंत 21 टी20 सामन्यांत भारतासाठी 34 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला जेव्हाही संधी मिळाली आहे, त्यावेळी त्याने त्या संधीचा फायदा घेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

बिश्नोईने भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वी 2020 साली झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्येही प्रभावित करणारी कामगिरी केली होती. त्याने त्या स्पर्धेत 17 विकेट्स घेतल्या होत्या.

रवी बिश्नोईकडे रविंद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्यानंतरचा फिरकी गोलंदाजीसाठी एक चांगला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, त्याने आता क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळावल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की टी20 क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 जणांमध्ये रवी बिश्नोई एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याच्यानंतर अक्षर पटेलने 11 वा क्रमांक मिळवला आहे. त्यानेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती.

फलंदाजांबद्दल सांगायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सर्वाधिक 223 धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने 7वा क्रमांक मिळवला आहे. तो पहिल्यांदाच पहिल्या 10 फलंदाजांमध्ये आला आहे. त्याच्याव्यतिरिक्त पहिल्या 10 जणांमध्ये भारताचा सूर्यकुमार यादव देखील आहे. तो अव्वल क्रमांकावर आहे.

त्यामुळे आता टी20 क्रमवारीत फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर भारतीय खेळाडूच विराजमान आहेत. इतकेच नाही, तर संघ क्रमवारीतही भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT