Matthew Hayden controversial on-air comments about Umpire's decisions during India vs Australia 5th T20I:
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (3 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेतील पाचव्या सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला. बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.
मात्र या सामन्यातील अखेरचे षटक वादग्रस्त ठरले होते. या षटकावेळी मॅथ्यू हेडनने पंचांकडून चूक झाल्याचेही म्हटले.
या सामन्यात भारताने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात विजयासाठी 10 धावांची गरज होती. या षटकात भारताकडून अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेड फलंदाजी करत होता. त्यावेळी अर्शदीपने पहिलाच चेंडू बाउंसर टाकला. त्यावर स्क्वेअर लेगला उभे असलेल्या पंचांनी वाईड न दिल्याने वेड चांगलाच भडकला होता. त्यानंतर रिप्लेमध्ये दिसले ती चेंडूला बरीच उंची होती आणि तो चेंडू वेडच्या हेल्मेटवरून जात होता.
तसेच नंतर पाचव्या चेंडूवर नॅथन एलिसने खेळलेल्या जोरदार शॉटवर वेगात चेंडू सरळ जात असताना आधी अर्शदीपने तो आडवण्यासाठी हात मध्ये घातला.पण त्याच्या हाताला चेंडू लागून तो थोडा वळला. त्यावेळी पंच विरेंद्र शर्मा यांच्या उजव्या पायाला तो चेंडू लागून आडला. कदाचीत हा चेंडू अडला नसता, तर तो चेंडू चौकारासाठी जाऊ शकत होता.
या गोष्टी लक्षात घेता त्यावेळी सामन्यात समालोचन करत असताना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने पंचांवर निराशा व्यक्त करताना पक्षपाताचाही दावा केला.
पंचांनी पहिला चेंडू वाईड न देण्याबद्दल हेडन म्हणाला, 'तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता वेड का निराश होता. तो चेंडू नक्कीच वाईड होता. त्याच्या डोक्याच्या वरून तो चेंडू गेला. तो जरी उभा राहिला असता, तरी तो चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून गेला असता.'
त्यानंतर जेव्हा पंचांना चेंडू लागून तो अडला, त्यावेळी हेडन म्हणाला, 'पंचांनी त्यांचे काम केले आहे. हे पाहा. यावेळी फ्रंट अंपायर होता, स्क्वेअर नाही. त्यांची काहीतरी मिलीभगत आहे.'
दरम्यान, या सामन्यात पहिल्या दोन चेंडूनंतर मॅथ्यू वेडला अर्शदीपने 22 धावांवर बाद केले होते. त्यांनंतर त्याने अखेरच्या तीन चेंडूवर तीनच धावा दिल्या. त्यामुळे भारताने 6 धावांनी हा सामना जिंकला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.