IND vs AUS: रवी बिश्नोईच्या फिरकीची जादू! 9 विकेट्ससह आर अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी

Ravi Bishnoi Record: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेचा मालिकावीर पुरस्कार रवी बिश्नोईने पटकावला, याबरोबरच त्याने एका मोठा विक्रमालाही गवसणी घातली आहे.
Ravi Bishnoi | India vs Australia
Ravi Bishnoi | India vs AustraliaBCCI
Published on
Updated on

India vs Australia, 5th T20I at Bengaluru, Ravi Bishnoi Record:

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी (3 डिसेंबर) 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकाही 4-1 फरकाने जिंकली. या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार रवी बिश्नोईने मिळवला. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला.

रविवारी झालेल्या सामन्यात बिश्नोईने 4 षटके गोलंदाजी करताना 29 धावांत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने या मालिकेत पाचही सामन्यात खेळताना 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचमुळे त्याने भारतासाठी एका द्विपक्षीय टी20 मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या आर अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

आर अश्विनने 2016 साली श्रीलंकेविरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतासाठी 9 विकेट्स घेतल्या होत्या.

Ravi Bishnoi | India vs Australia
IND vs AUS: आई गं...! एलिसच्या शॉटचा अंपायरला फटका, पाहा शेवटच्या ओव्हरमधील ड्रामा

भारतासाठी एका द्विपक्षीय टी20 मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • 9 विकेट्स - आर अश्विन (वि. श्रीलंका, 2016)

  • 9 विकेट्स - रवी बिश्नोई (वि. ऑस्ट्रेलिया, 2023)

  • 8 विकेट्स - युजवेंद्र चहल (वि. इंग्लंड, 2017)

  • 8 विकेट्स - युजवेंद्र चहल (वि. श्रीलंका, 2017)

  • 8 विकेट्स - दीपक चाहर (वि. बांगलादेश, 2019)

  • 8 विकेट्स - शार्दुल ठाकूर (वि. न्यूझीलंड, 2020)

  • 8 विकेट्स - शार्दुल ठाकूर (वि.इंग्लंड, 2021)

  • 8 विकेट्स - रवी बिश्नोई (वि. वेस्ट इंडिज, 2022)

  • 8 विकेट्स - अक्षर पटेल (वि. ऑस्ट्रेलिया, 2022)

भारताचा विजय

रविवारी झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 161 धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 8 बाद 154 धावाच करता आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने 54 धावांची खेळी केली. तसेच ट्रेविस हेडने 28 धावांची आणि वेडने 22 धावांची खेळी केली. बाकी कोणाला खास काही करता आले नाही. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Ravi Bishnoi | India vs Australia
Kevin Pietersen: रोहित-विराटला T20 World Cup मध्ये खेळवायचेच असेल तर आयपीएमध्ये... पिटरसनचा बीसीसीआयला सल्ला

तत्पुर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 160 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने 53 धावांची खेळी केली, तर अक्षर पटेलने 31 धावांची आणि जितेश शर्माने 24 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेऱ्हेनडॉर्फ आणि बेन ड्वारशुई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताचा मालिका विजय

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी20 मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले होते. मात्र, तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आव्हान कायम ठेवले होते. पण भारताने चौथ्या सामन्यात पुनरागमन करत विजयासह मालिकेवरही कब्जा केला. त्यानंतर पाचवा सामना जिंकत मालिका 4-1 फरकाने जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com