Rohit Sharma and Virat Kohli Record against Pakistan in International Cricket:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यात भारताचे आजी-माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर सर्वांचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, त्यांची आत्तापर्यंत पाकिस्तानविरुद्ध कशी कामगिरी झाली आहे, याचा थोडक्यात आढावा घेऊ.
विराट आणि रोहित या दोघांनीही पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान, विराट आणि रोहित हे दोघेही पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही कसोटी खेळलेले नाही. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध वनडे आणि टी20 सामने खेळले आहेत.
विराटने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 सामने खेळले आहेत, यात 15 वनडे सामन्यांचा आणि 10 टी20 सामन्यांचा समावेश आहे. विराटने या 25 सामन्यांमध्ये 63.88 च्या सरासरीने 1150 धावा केल्या आहेत. यामध्ये विराटच्या 3 शतकांचा आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच तो 7 वेळा नाबाद राहिला आहे, तर एकदाच शुन्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे विराटने त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम 183 धावांची खेळीही पाकिस्तानविरुद्धच केली होती. ही खेळी त्याने मीरपूरला 18 मार्च 2012 रोजी केली होती.
दरम्यान, वनडे वर्ल्डकपमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर विराटने पाकिस्तानविरुद्ध 3 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने एक शतक आणि एका अर्धशतकासह 193 धावा केल्या आहेत.
विराटने 2015 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध १०७ धावांची शतकी खेळी केली होती, तर 2019 मध्ये 77 धावा करत अर्धशतक झळकावले होते. तसेच 2011 मध्ये मात्र तो 9 धावांवर बाद झालेला.
तसेच अखेरच्यावेळी जेव्हा आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आले होते, तेव्हा विराटने 122 धावांनी नाबाद खेळी केली होती.
रोहितने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 सामने खेळले असून यात 18 वनडे सामन्यांचा आणि 11 टी20 सामन्यांचा समावेश आहे. रोहितने खेळलेल्या एकूण 29 सामन्यांमध्ये 37.54 च्या सरासरीने 2 शतके आणि 7 अर्धशतके केली आहेत.
तो 4 वेळा नाबाद राहिला आहे, तर 3 वेळा शुन्यावर बाद झाला आहे. 140 धावा ही त्याची पाकिस्तानविरुद्ध केलेली सर्वोत्तम खेळी आहे. ही खेळी त्याने 2019 वर्ल्डकप 2023 स्पर्धेत केली होती.
रोहितने पाकिस्तानविरुद्ध 2015 आणि 2019 वर्ल्डकपमध्ये सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2019 मध्ये शतक केले होते, तर 2015 मध्ये तो 15 धावांवर बाद झाला होता.
रोहितने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 56 धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.