IND vs PAK सामन्यापूर्वी सूर्यकुमारची पोस्ट व्हायरल; म्हणतोय 'भाईलोग सगळ्यांच्या घरी टीव्ही आहेत...'

Suryakumar Yadav: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavInstagram
Published on
Updated on

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 ची धामधूम सुरु आहे. हे वनडे वर्ल्डकपचे 13 वे पर्व आहे. तसेच भारतात तब्बल 12 वर्षांनी वनडे वर्ल्डकपचे सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या स्पर्धेत भारतानेही ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध मोठे विजय मिळत शानदार सुरुवात केली आहे. त्यामुळे आता हळुहळू सामन्यांना रंगत येण्यास सुरुवात झाली आहे.

त्यातच वर्ल्डकप म्हटले की प्रत्येक सामन्याबद्दल उत्सुकता असतेच. अनेक चाहतेही सामन्यांचा आनंद स्टेडियममध्ये जाऊन घेण्यासाठी उत्सुक असतात. त्याचमुळे बऱ्याचदा खेळाडूंकडे त्यांच्या जवळपासच्या व्यक्तींकडून अनेकदा तिकिटांसाठी विचारणा केली जाते.

हीच गोष्ट लक्षात घेत सूर्यकुमार यादवने शनिवारी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी इंस्टाग्रामवर एक विनंती केली आहे. त्याने विनंती केली आहे की घरी बसून सामने पाहा.

Suryakumar Yadav
IND vs PAK सामन्यापूर्वी रंगणार संगीत मैफील! कुठे अन् किती वाजता सुरू होणार सोहळा?
Suryakumar Yadav Post
Suryakumar Yadav PostInstagram

त्याने इंस्टाग्रामच्या स्टोरीवर एक पोस्ट केली आहे, ज्यात लिहिले आहे की 'भाईलोग सगळ्यांच्या घरी चांगले चांगले टीव्ही आहेत. मजा करा आणि एसीमध्ये बसून सामना पाहा. कृपया अजून तिकिटांसाठी विनंती करू नका.' त्याची ही स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे.

दरम्यान अशी विनंती करणारा सूर्यकुमार पहिलाच भारतीय क्रिकेटपटू नाही. त्याच्याआधी वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीनेही अशी विनंती केली होती. ज्यावर त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही प्रतिक्रिया दिली होती.

Suryakumar Yadav
Shubman Gill: 'कॅन्सर असताना वर्ल्डकप खेळलेलो...', युवराजला IND vs PAK सामन्यात गिल खेळण्याची आशा
Virat Kohli | Anushka Sharma Post
Virat Kohli | Anushka Sharma PostInstagram

विराटने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की 'आता वर्ल्डकप स्पर्धा सुरू होत आहे. मी माझ्या सर्व मित्रांना नम्रपणे सांगतो की संपूर्ण स्पर्धेदरम्यान मला तिकिटांसाठी विनंती करू नका. कृपया तुमच्या घरून मजा घ्या.'

त्याची ही पोस्ट अनुष्का शर्मानेही शेअर करत लिहिले की 'मला यात एक गोष्ट अजून जोडायची आहे, जर तुमच्या मेसेजला उत्तर मिळाले नाही, तर कृपला तुम्हाला मदत करण्यासाठी मला विनंती करू नका. तुम्ही समजून घ्याल, यासाठी आभार.' विराट आणि अनुष्काच्या या पोस्टची जोरदार चर्चा झाली होती.

दरम्यान, वर्ल्डकप 2023 चा सध्या सुरुवातीचा टप्पा सुरू आहे. या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. हे 48 सामने 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com