Ind Vs Wi 2nd ODI Playing 11 Twitter/ @BCCI
क्रीडा

Ind Vs Wi 2nd ODI Playing 11: वेस्ट इंडिज ने का बदलला कर्णधार?

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

दैनिक गोमन्तक

Ind Vs Wi, 2nd ODI Playing 11: अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज (INDvsWI) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला (Team India) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड खेळत नसून निकोलस पूरन कर्णधार आहे.

उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियात परतला आहे, तर इशान किशनला वगळण्यात आले आहे. पहिल्या सामन्यात केएल राहुल उपलब्ध नव्हता, त्यामुळे इशान किशनला सलामी द्यावी लागली.आज अनोखी ओपनिंग जोडी मैदानात उतरली रोहितच्या जोडीला वृषभ पंत मैदानात उतरताना दिसला.

भारतीय टिम-11: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रणंद कृष्णा

वेस्ट इंडीज टिम-11: शाई होप (यष्टीरक्षक), ब्रँडन किंग, डॅरेन ब्राव्हो, एस. ब्रूक्स, निकोलस पूरन (सी), जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, फॅबियन ऍलन, अकील होसेन, ए. जोसेफ, किमार रोच

वेस्ट इंडिजला कर्णधार बदलावा लागला

वेस्ट इंडिजचा कर्णधार किरन पोलार्ड दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही, त्यामुळे निकोलस पूरनला कर्णधारपद भूषवायचे आहे. किरन पोलार्ड पहिल्या सामन्यात विशेष काही करू शकला नाही, पण कर्णधार संघातून बाहेर पडणे हा वेस्ट इंडिजसाठी मोठा धक्का आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबादमध्येच तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्स राखून विजय मिळवला, जर टीम इंडियाने दुसरी वनडेही जिंकली तर ही मालिका भापतीय संघाच्या खिशात जाईल. मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांना कोलकातामध्ये 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT