वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया बुधवारी मालिकेवर कब्जा करण्यासाठी उतरणार आहे. प्रथमच कर्णधार म्हणून आलेल्या रोहितसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. संघाच्या विजयासोबतच रोहितच्या (Rohit Sharma) नजरा खास रेकॉर्डवरही असतील. (Rohit Sharma and MS Dhoni Latest News)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने षटकार ठोकला आणि यासह त्याने घरच्या मैदानावर वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या धोनीच्या (MS Dhoni) विक्रमाची बरोबरी केली. रोहित आणि धोनी दोघांनीही भारतीय भूमीवर आतापर्यंत 116 षटकार मारले आहेत.
धोनीने भारतात खेळल्या गेलेल्या 113 एकदिवसीय डावांमध्ये 116 षटकार मारले आहेत, तर रोहितने केवळ 68 डावांमध्ये इतके षटकार मारले आहेत. षटकार मारताच तो या बाबतीत पुढे जाईल.
मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित सध्या जगात पाचव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने मायदेशात 147 षटकार ठोकले आहेत. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल (130), ब्रेंडन मॅक्युलम (126) आणि इंग्लंडचा इऑन मॉर्गन (119) यांचा क्रमांक लागतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.