IND Vs SA: Team India departure for south Africa tour today

 

Dainik Gomantak

क्रीडा

IND VS SA: विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा बदला घेणार? की ...

टीम इंडियाने 7 वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे आणि प्रत्येक वेळी तीला हार पत्करावी लागली आहे.

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच टीम इंडिया (Team India) आज जोहान्सबर्गला रवाना होणार आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (IND Vs SA) 3 कसोटी (Test Match) आणि 3 एकदिवसीय (ODI) सामन्यांची मालिका खेळायची आहे. येणाऱ्या 26 डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही ही खंत आहे आणि यावेळी हा इतिहास बदलण्यासाठी टीम इंडिया शर्तीचे प्रयत्न करणार हे मात्र नक्की. (IND Vs SA: Team India departure for south Africa tour today)

विराट कोहली आता एकदिवसीय आणि T-20 कर्णधार राहिलेला नाही, पण कसोटी कर्णधार म्हणून तो त्याच्या यशाची पुनरावृत्ती करू इच्छितो. ऑस्ट्रेलियात दोन वेळा कसोटी मालिका जिंकणाऱ्या विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणे हे टीम इंडियाचे ध्येय असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. कसोटी संघात रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने खेळणार नाही मात्र विराट कोहलीचा संघावर विश्वास आहे.असे त्याने सांगितले आहे.

दक्षिण आफ्रिकेतून 7 वेळा रिकाम्या हाताने परतली आहे टीम इंडिया!

टीम इंडियाने 7 वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे आणि प्रत्येक वेळी तीला हार पत्करावी लागली आहे. गेल्या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली पण कसोटी मालिका 2-1 ने गमावली. 2010-11 मध्ये टीम इंडियाने कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती. यावेळी विराट कोहलीला त्याच्या नेतृत्वाखालील संघाने दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवून द्यावा, कारण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे.

तसे, टीम इंडियासाठी कठीण गोष्ट म्हणजे विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे तीन सर्वात वरिष्ठ खेळाडू फॉर्मात नाहीत. रोहित शर्मा फॉर्मात होता पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

भारतीय संघ 26-30 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे पहिली कसोटी खेळणार आहे. दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर 19 जानेवारीपासून पार्ल येथे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. 21 जानेवारीला दुसरा एकदिवसीय सामनाही पार्ल येथे होणार आहे. शेवटचा एकदिवसीय सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT