आरोप-प्रत्यारोपानंतर विराट कोहलीचा मोठा गौफ्यस्फोट

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) आपण वनडे मालिका खेळण्यासाठी तयार आणि उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
Virat Kohli 

Virat Kohli 

Dainik Gomantak 

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) आपण वनडे मालिका (ODI Series) खेळण्यासाठी तयार आणि उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराने मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याआधी बातमीत म्हटले होते की, कोहली त्याच्या मुलीच्या वाढदिवसामुळे एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेऊ शकतो. मात्र त्याने पत्रकारांशी संवाद साधत या वृत्तांना पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात वाद सुरु आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर अशा बातम्यांना आणखी वेग आला.

दरम्यान, विराट कोहली म्हणाला की, मी निवडीसाठी उपलब्ध होतो आणि अजूनही आहे. मी कधीही बीसीसीआयला (BCCI) विश्रांतीची मागणी केलेली नाही. मी दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे, आणि नेहमीच होतो. तुम्ही मला असे प्रश्न विचारु नका, हे प्रश्न अशा बातम्या आणि सूत्रांनी लिहिणाऱ्यांना विचारावेत. अशा बातम्या लिहिणारे हे सर्व लोक विश्वासार्ह नाहीत. वनडे खेळण्यासाठी मी नेहमीच उपलब्ध होतो.

<div class="paragraphs"><p>Virat Kohli&nbsp;</p></div>
IND VS SA: किंग कोहलीनं सुट्टीसाठी अर्ज केलाच नाही?

कोहलीचे वनडे कर्णधारपद काढून घेण्यात आले

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केल्यानंतर विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद घेण्यात आले. त्याच्या जागी रोहित शर्माकडे वनडेची कमान सोपवण्यात आली आहे. याआधी विराट कोहलीने टी-20 विश्वचषकापूर्वीच (T20 World Cup) टी-20 कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. ही जबाबदारीही रोहितवर देण्यात आली होती. अशा स्थितीत विराटकडून वनडेचे कर्णधारपद काढून घेण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या सर्व गोष्टींमुळे टीम इंडियामध्ये (Team India) एकजूट नसल्याच्या अटकेलाही खतपाणी घातलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com