Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India ODI Record: भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड, तरीही लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर

Team India Breaks Australia’s ODI Record: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली.

Manish Jadhav

Team India Breaks Australia’s ODI Record: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यातील विजयासह, टीम इंडियाने केवळ मालिकाच जिंकली नाही तर ऑस्ट्रेलियाचा 24 वर्षे जुना विक्रमही मोडला. यावर्षी टीम इंडिया सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकणारा संघ बनला. असे असूनही एका वर्षात सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याच्या बाबतीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, टीम इंडियाने 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. टीमने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलग 10 सामने जिंकले. मात्र, दुर्दैवाने सलग 10 विजयानंतर टीम इंडियाला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाने यावर्षी 35 पैकी 27 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर यावर्षी टीम इंडियाला केवळ सात एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यावर्षी टीम इंडियाचा एक वनडे सामना अनिर्णित राहिला आहे.

2023 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकणारे संघ

भारत- 27 विजय (35 वनडे)

दक्षिण आफ्रिका- 16 विजय (25 वनडे)

श्रीलंका- 16 विजय (31 वनडे)

न्यूझीलंड- 15 विजय (32 वनडे)

ऑस्ट्रेलिया- 14 विजय (22 वनडे)

एका वर्षात सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकणारे संघ

ऑस्ट्रेलिया- 30 (2003)

भारत- 27* (2023)

ऑस्ट्रेलिया- 26 (1999)

केएल राहुलने बदला घेतला

केएल राहुलने 2021-22 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 3-0 च्या पराभवाचा बदला घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारताचा हा दुसरा एकदिवसीय मालिका विजय आहे. यापूर्वी, 2017-18 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर वनडे मालिका 5-1 ने जिंकली होती. वनडेपूर्वी टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. आता 26 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT