Team India: विराट-जड्डूची मस्ती अन् शार्दुलनं ड्रेसिंग रुममध्ये जिंकलं स्पेशल मेडल, पाहा Video

Shardul Thakur: अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर शार्दुल ठाकूरला विराट कोहलीच्या हस्ते भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये खास मेडल देण्यात आले.
Virat Kohli - Shardul Thakur
Virat Kohli - Shardul ThakurBCCI
Published on
Updated on

Shardul Thakur receive Best Fielder Medal from Virat Kohli:

भारतीय क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान अशा दोन्ही सामन्यात शानदार कामगिरी केली आहे.

दरम्यान, या वर्ल्डकपपासून भारतीय संघात एक नवी परंपरा चालू झाल्याचे दिसले आहे. प्रत्येक सामन्यानंतर संघातील सर्वोत्तम खेळाडूला त्या सामन्यातील शानदार क्षेत्ररक्षणासाठी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून पदक दिले जाते.

8 ऑक्टोबर रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीला हे पदक मिळाले होते. त्यानंतर आता बुधवारी (11 ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक शार्दुल ठाकूरला देण्यात आले. याचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.

Virat Kohli - Shardul Thakur
IND vs AFG: शतक रोहितचं, पण चर्चा विराट-नवीनची! चाहत्यांना झाली स्मिथची आठवण, पण का? वाचा सविस्तर

शार्दुलने या सामन्यात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर 13 व्या षटकात रेहमनुल्लाह गुरबाजचा बाउंड्री लाईनवर शानदार झेल घेतला होता. त्याने हा झेल बाउंड्री लाईनच्या आत घेतला होता, पण तोल जाईल म्हणून त्याने हवेत चेंडू फेकला आणि त्यानंतर तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पुन्हा आत आत आला आणि नियंत्रण मिळवत हवेत फेकलेला झेल घेतला.

या झेलबद्दल शार्दुल बीसीसीआयशी बोलताना म्हणाला की 'तो झेल महत्त्वाच्या क्षणी आला होता. हार्दिकने उसळणारा चेंडू टाकण्याची संधी घेतली होती आणि आम्हाला त्या क्षणी विकेटची गरज होती. तो झेल घेऊ शकलो, त्यासाठी खूश आहे.'

'मी या संघाचा गेल्या काही वर्षापासून भाग आहे आणि मला हे खेळाडू खूप चांगले माहिती आहेत. मी ड्रेसिंग रुममध्ये खूप कम्फर्टेबल असतो आणि आम्ही असे वातावरण तयार केले आहे, जिथे सिनियर आणि ज्यूनियर यांसारख्या गोष्टी नसतात. सर्वतर खूप चांगले मिसळले आहेत. तुम्हाला येथे नर्व्हसनेस जाणवत नाही.'

Virat Kohli - Shardul Thakur
'IND vs PAK सामन्यासाठी आता...' अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरची पोस्ट व्हायरल

दरम्यान, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी सामन्यात शानदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचे कौतुक केले.

त्यानंतर त्यांनी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पदक विजेता खेळाडू म्हणून शार्दुलची निवड केली. यावेळी विराट आणि रविंद्र जडेजासह संघातील इतर खेळाडू मस्ती करताना दिसले. तसेच शार्दुलला विराट कोहलीच्या हस्ते हे पदक देण्यात आले.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर अफगाणिस्तानने कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी (80) आणि अझमतुल्लाह उमरझाई (62) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 273 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग भारताने 35 षटकात 2 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. भारताकडून रोहित शर्माने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांसह 131 धावांची खेळी केली. तसेच विराटने नाबाद 55 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com