Team India: वर्ल्डकपनंतर दोनच महिन्यात 'हा' संघ पुन्हा येणार भारत दौऱ्यावर, वेळापत्रक आले समोर

India vs Afghanistan T20 Series: भारतीय क्रिकेट संघाचे भविष्यातील वेळापत्रक चांगलेच व्यस्त असणार आहे.
Team India
Team IndiaBCCI
Published on
Updated on

Team India Timetable:

भारतातील वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा नुकतील 19 नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतरही भारताचे वेळापत्रक व्यस्त आहे. आता जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या एका टी20 मालिकेचेही वेळापत्रक समोर आले आहे.

अफगाणिस्तान संघ जानेवारी 2024 महिन्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतात येणार आहे. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिल्यांदाच तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात येणार आहे. इतकेच नाही, तर अफगाणिस्तान पहिल्यांदाच भारतात भारताविरुद्ध टी20 सामना खेळणार आहे.

अफगाणिस्तानने नुकतेच वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतात खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्स या संघांन पराभूत करत गुणतालिकेत सहावा क्रमांक मिळवला होता. तसेच त्यांनी 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही थेट पात्रता मिळवली.

Team India
FIFA World Cup 2026 Qualifier: छेत्री ब्रिगेडचा कतारकडून दारुण पराभव, पात्रता फेरीचा दुसरा सामना गमावला!

आता भारताविरुद्ध टी20 मालिका खेळण्यास अफगाणिस्तान सज्ज आहे. भारत आणि अफगाणिस्तान संघात 11, 14 आणि 17 जानेवारी 2024 दरम्यान टी20 सामने खेळवले जाणार आहेत.

दरम्यान, ही मालिका भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर लगेचच खेळवली जाणार आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान खेळवला जाणार आहे. या दौऱ्यात 3 टी20 सामने, 3 वनडे सामने आणि 2 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. त्याआधी 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.

Team India
ICC Change World Cup Venue: 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपचे ICC ने बदलले ठिकाण, श्रीलंकेला दुसरा मोठा झटका!

अफगाणिस्तान आणि भारत यांचे टी20 सामने

अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात पहिल्यांदाच टी20 मालिका होणार असली तरी या दोन संघात यापूर्वी 5 टी20 सामने खेळवण्यात आले आहेत.

या दोन संघात अखेरचा टी20 सामना याचवर्षी ऑगस्ट महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामन्यात झाला होता. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. तसेच त्याआधी झालेले चारही टी20 सामने भारताने जिंकले आहेत.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी20 मालिका 2024

  • 11 जानेवारी - पहिला टी20 सामना

  • 14 जानेवारी - दुसरा टी20 सामना

  • 17 जानेवारी - तिसरा टी20 सामना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com