Team India Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs NZ: ब्रेसवेलच्या खेळीने उडाली झोप, गिलचे द्विशतक; जाणून घ्या भारताच्या विजयाचे पाच पॉइंट्स

India vs New Zealand: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंड वनडे मालिकेत विजयी सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंड वनडे मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. हैदराबादमध्ये बुधवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 12 धावांनी रोमांचक विजय नोंदवला. शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने 350 धावांचे लक्ष्य दिले, त्याला प्रत्युत्तरात किवी संघ 49.2 षटकात 337 धावांवर गारद झाला. आम्ही तुम्हाला भारताच्या रोमांचक विजयाविषयी पाच गोष्टी सांगणार आहोत.

शुभमन गिलचे द्विशतक

अंडर-19 विश्वचषक 2018 मध्ये आपला करिष्मा दाखवल्यानंतर गिलला भारतीय क्रिकेटमधील पुढचा स्टार म्हणून ओळखले जात आहे. 150 धावा पूर्ण केल्यानंतर त्याने आपल्या डावात सहा षटकार ठोकले. गिलने 149 चेंडूंचा सामना करत 208 धावा केल्या, ज्यात 19 चौकार आणि नऊ षटकार मारले. शुभमन गिलच्या पहिल्या द्विशतकाच्या जोरावर भारताने (India) आठ गडी गमावून 349 धावा केल्या.

मोहम्मद सिराजचे चार बळी

हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. सुरुवातीच्या षटकांमध्ये त्याने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने इनफिल्डर डेव्हॉन कॉनवेला बाद केले. त्यानंतर त्याने मधल्या षटकांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला बाद केले. यानंतर रोहितने 46 व्या षटकात सिराजकडे चेंडू सोपवला आणि त्याच षटकात त्याने दोन बळी (मिचेल सँटनर आणि शिल्पी) घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणले.

कुलदीप यादवची किफायतशीर गोलंदाजी

सलामीवीर बाद झाल्यानंतर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) या सामन्यात भारताला आणखी दोन बळी मिळवून देत न्यूझीलंडवर दडपण आणले. कुलदीपने हेन्री निकोल्स आणि डॅरिल मिशेलला बाद केले.

रोहित आणि गिलची शानदार सुरुवात

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करुन दिली. प्रथम फलंदाजी करताना या जोडीने पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. रोहित 38 चेंडूत 34 धावा करुन बाद झाला, तर गिलने त्याचे पहिले एकदिवसीय द्विशतक झळकावले आणि असे करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला.

अखेरच्या दोन षटकांत भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवला

न्यूझीलंडला शेवटच्या 12 चेंडूत 24 धावांची गरज होती. तर धावा वाचवणे भारतासाठी सोपे नव्हते. कारण शमीविरुद्ध किवी संघाने 48 व्या षटकात 17 धावा केल्या होत्या. परंतु हार्दिकने तगडी गोलंदाजी करत फर्ग्युसनला बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT