Ind vs NZ ODI: हार्दिक पंड्याच्या विकेटवरुन वाद पेटला, 'निर्णय पूर्णपणे चुकीचा...!

Ind vs NZ: भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन दिवसीय वनडे मालिका खेळवली जात आहे. या तीन दिवसीय सामन्यापैकी पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळवला जात आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

Ind vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन दिवसीय वनडे मालिका खेळवली जात आहे. या तीन दिवसीय सामन्यापैकी पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळवला जात आहे.

दरम्यान, भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 38 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार मारले. मात्र, 40 व्या षटकात डॅरिल मिशेलने हार्दिकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याला बोल्ड ठरवण्यात आले. मात्र, हार्दिकला आऊट देण्यावरुन वाद निर्माण झाला. त्यानंतर सोशल मीडियावरही (Social Media) लोक यावरुन नाराजी व्यक्त करु लागले. त्याचबरोबर भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंनीही नाराजी व्यक्त केली.

Hardik Pandya
IND vs NZ, ODI: टीम इंडियाच्या या 5 खेळाडूंवर सर्वांच्या नजरा, किवींना करणार चीतपट

हार्दिक पंड्याच्या चाहत्यांनी आक्षेप घेतली

नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, केवळ शुभमन गिल सलामीच्या क्रमात चमत्कार करु शकला आणि शतकानंतरही खेळत राहिला. एकीकडे, शतकानंतर गिल शांतपणे फलंदाजी करत होता, तर दुसरीकडे, हार्दिक तूफान फटकेबाजी करत होता. परंतु मिशेलच्या चेंडूवर तो बाद झाला. मात्र त्याच्या बाद होण्यावर त्याच्या चाहत्यांनी आक्षेप घेतला.

Hardik Pandya
IND vs NZ: टीम इंडियाला मोठा झटका! वनडे मालिकेतून घातक खेळाडू आऊट, 'या' खेळाडूला संधी

कामगिरी कशी होती?

सुरुवातीच्या क्रमाबद्दल बोलायचे झाल्यास, रोहित शर्मा 38 धावांवर 34 धावा करून बाद झाला. विराट कोहिल 10 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. ईशान किशनलाही फार काही करता आले नाही आणि तो 5 धावा करुन बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारने 26 चेंडूत 31 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com