IND vs NZ 1st ODI Match: केएल राहुल आऊट, आता 'या' खेळाडूला मिळणार प्लेइंग 11 मध्ये स्थान

IND vs NZ 1st ODI Match: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत विकेटकीपर फलंदाज केएल राहुल टीम इंडियाचा भाग नाही.
KL Rahul
KL Rahul Dainik Gomantak

IND vs NZ 1st ODI Match: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत विकेटकीपर फलंदाज केएल राहुल टीम इंडियाचा भाग नाही. या मालिकेतून केएल राहुलला विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा एका नव्या यष्टीरक्षक फलंदाजासह न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या शर्यतीत 24 वर्षीय युवा खेळाडू आघाडीवर आहे, नुकत्याच झालेल्या श्रीलंका मालिकेतही हा खेळाडू संघाचा भाग होता.

हा खेळाडू केएल राहुलची जागा घेणार

भारतीय सिलेक्टर्संनी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ईशान किशन आणि केएस भरत यांचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश केला आहे. या मालिकेत केएल राहुलच्या (KL Rahul) जागी ईशान किशन सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. ईशान किशनने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे.

KL Rahul
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड मालिकेपूर्वीच आली धक्कादायक बातमी, दुखापतीमुळे 'हा' खेळाडू...

यापूर्वीही यष्टिरक्षक म्हणून संघात सामील झाला होता

या मालिकेपूर्वीही ईशान किशन (Ishan Kishan) भारताकडून अनेक वेळा यष्टिरक्षक म्हणून खेळला आहे. या मालिकेतही तो त्याच भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर ईशान किशनच्या फलंदाजीतही बदल पाहायला मिळणार आहे. त्याचा बराच काळ सलामीवीर म्हणून संघात समावेश होता, परंतु आता तो मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसतो. रोहित शर्मा सलामीवीर असल्याने शुभमन गिल संघाची पहिली पसंती ठरु शकतो.

KL Rahul
IND vs NZ, 3rd ODI: टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं! पावसाची जोरदार 'बॅटिंग'

शेवटच्या सामन्यात द्विशतक झळकावले

बांगलादेश दौऱ्यावर ईशान किशनने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला. उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात ईशान किशनचा समावेश करण्यात आला होता. या सामन्यात त्याने 210 धावांची खेळी केली. मात्र यानंतर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ईशान किशनने भारतीय संघासाठी 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 477 धावा केल्या आहेत, ज्यात एका द्विशतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 24 टी-20 सामन्यात 629 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com