Team India ODI
Team India ODIDainik Gomantak

IND vs NZ, ODI: टीम इंडियाच्या या 5 खेळाडूंवर सर्वांच्या नजरा, किवींना करणार चीतपट

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान विराट-रोहितसह कोणत्या 5 खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल, जाणून घ्या.
Published on

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादला होणार आहे. तसेच त्यानंतर रायपूरला २१ जानेवारी रोजी आणि 24 जानेवारी रोजी इंदोरला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना खेळवला जाईल.

या मालिकेआधी दोन्ही संघांचा आत्मविश्वास उंचवलेला आहे. भारताने या मालिकेपूर्वी श्रीलंकेला मायदेशातच 3-0 अशा फरकाने पराभूत केले आहे. तर न्यूझीलंड संघ पाकिस्तानला पाकिस्तानमध्येच वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत करत भारत दौऱ्यावर आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या या वनडे मालिकेदरम्यान काही भारतीय खेळाडूंवरही सर्वांची नजर राहाणार आहे. अशाच 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Team India ODI
India vs New Zealand: वनडेमध्ये कोणाचं वर्चस्व? एका क्लिकवर जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

1. विराट कोहली - भारताचा भरवशाचा फलंदाज विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या 4 वनडे सामन्यांपैकी 3 सामन्यांत शतके केली आहेत. त्याने नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 2 शतके केली होती. त्याने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडेत आक्रमक फलंदाजीही केली होती. त्यामुळे आता तो त्याचा हाच फॉर्म न्यूझीलंडविरुद्धही कायम ठेवणार का हे पाहावे लागेल.

2. रोहित शर्मा - भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मादेखील चांगल्या फॉर्ममध्ये परतल्याचे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दिसले होते. तो भारताला चांगली सुरुवात देण्यात यशस्वीही होत आहे.

मात्र, त्याला त्याच्या चांगल्या सुरुवातीचे रुपांतर गेल्या काही काळात शतकात करता आलेले नाही. त्याने 2019 साली अखेरचे वनडे शतक केले होते. त्यामुळे आता चाहत्यांना त्याच्याकडून वनडे शतकाची अपेक्षा आहे.

Team India ODI
India vs New Zealand: उद्यापासून सुरू होणार थरार! जाणून घ्या दोन्ही संघ अन् संपूर्ण वेळापत्रक

3. ईशान किशन - यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करण्याची संधी दिली जाणार असल्याचे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याला आला फिनिशरची भूमिकाही निभावण्याची संधी मिळू शकते.

दरम्यान, त्याने त्याचा शेवटचा वनडे बांगलादेशविरुद्ध खेळताना द्विशतकी खेळी केली होती. त्यामुळे त्यानंतर आता तो न्यूझीलंडविरुद्ध कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल.

4. कुलदीप यादव - चायनामन गोलंदाज कुलदीप यादव देखील चांगल्या लयीत आहे. त्याला नजीकच्या काळात जेव्हाही संधी मिळाली आहे, त्यावेळी त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही दोन सामन्यांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीनंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धही संधी मिळलण्याची शक्यता आहे.

5. मोहम्मद सिराज - जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांतच 9 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यामुळे आता तो आगामी काळतही त्याची हीच लय कायम ठेवणार का हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com