Dhurandhar 2: रिलीजपूर्वीच ‘धुरंधर ’चा धमाका! विक्रमी ऍडव्हान्स बुकिंग; सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

Dhurandhar 2 Advance Booking: रणवीर सिंग अभिनीत बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन-स्पाय चित्रपट ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चेत आला आहे.
Dhurandhar 2 Record
Dhurandhar 2 RecordDainik Gomantak
Published on
Updated on

रणवीर सिंग अभिनीत बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन-स्पाय चित्रपट ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या पेड प्रीव्ह्यू शोसाठी प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आगाऊ तिकिटविक्रीने विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

मंगळवार रात्रीपर्यंत देशातील प्रमुख मल्टिप्लेक्स साखळ्या पीव्हीआर आयनॉक्स आणि सिनेपोलिस येथे सुमारे १.९ लाख तिकिटांची विक्री झाली आहे. चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा उत्साह कायम असून बुधवारी सकाळपर्यंत ही संख्या दोन लाखांच्या टप्प्याजवळ पोहोचेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रीय मल्टिप्लेक्सपुरतेच नव्हे तर देशभरातील इतर थिएटरमध्येही या चित्रपटाच्या तिकिटांना मोठी मागणी दिसून येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण आगाऊ तिकिटविक्री जवळपास ३.५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. विशेष म्हणजे विक्री सुरू झाल्यानंतर चौथ्या दिवशीही चित्रपटाने राष्ट्रीय मल्टिप्लेक्स साखळ्यांमध्ये तब्बल २५ हजार तिकिटांची भर घातली. दीर्घ प्री-सेल्स कालावधी असूनही तिकिटविक्रीचा वेग स्थिर असल्याचे चित्र दिसत आहे.

व्यापार विश्लेषकांच्या मते, ‘धुरंधर २’मध्ये पहिल्याच दिवशी ५५ कोटी रुपयांपेक्षा अधिक नेट कमाई करण्याची क्षमता आहे. सकारात्मक प्रतिसाद कायम राहिल्यास हा आकडा पुढे ६५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र यावर्षी ईदची सुट्टी २१ मार्चला असल्याने चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळच्या शोवर त्याचा काहीसा परिणाम होऊ शकतो, असेही जाणकारांचे मत आहे.

Dhurandhar 2 Record
VIDEO: फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष बघताहेत Dhurandhar 2 ची वाट! पहिला भाग आवडल्याची दिली माहिती; चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

तरीही रणवीर सिंगच्या या अ‍ॅक्शनपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याने चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.पेड प्रीव्ह्यूमधूनच सुमारे २३.९१ कोटी रुपयांची कमाई झाल्याचे सांगितले जाते.

Dhurandhar 2 Record
Dhurandhar 2 Trailer: हिंदू बहुत ही डरपोक... ! 'धुरंधर 2'चा ट्रेलर रिलीज, हमजा अली अब्बासीच्या क्रूर लूकने वेधलं लक्ष VIDEO

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अ‍ॅक्शन, थरार आणि भव्य निर्मितीमूल्यामुळे ‘धुरंधर २’ हा चित्रपट यंदाच्या वर्षातील मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com