''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

Property Dispute False Case: एका स्वप्नामुळे निर्माण झालेल्या भ्रमातून एखाद्याचे आयुष्य किती उद्ध्वस्त होऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आले.
Air Force Personnel Acquitted
Property Dispute False CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Air Force Personnel Acquitted: एका स्वप्नामुळे निर्माण झालेल्या भ्रमातून एखाद्याचे आयुष्य किती उद्ध्वस्त होऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आले. भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या एका जवानाला स्वतःच्या अल्पवयीन मेव्हणीचा विनयभंग केल्याच्या खोट्या आरोपाखाली तब्बल सात वर्षे कायदेशीर संघर्ष करावा लागला. अखेर, कानपूरच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने या जवानाची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. या निकालात सर्वात महत्त्वाची ठरली ती 'पीडित' म्हटल्या जाणाऱ्या मेव्हणीची साक्ष, ज्यामध्ये तिने कबूल केले की ती घटना प्रत्यक्षात घडलीच नव्हती, तर एका 'स्वप्ना'मुळे तिला तो भास झाला होता.

या प्रकरणाची पाळेमुळे फेब्रुवारी 2019 मध्ये रुजलेली आहेत. बिठूर येथील रहिवासी असलेले हवाई दलाचे कर्मचारी अनुराग शुक्ला याचा विवाह 10 फेब्रुवारी 2019 रोजी झाला. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच, म्हणजे 8 मार्च 2019 च्या रात्री, त्याच्या मेव्हणीने (वय 15 वर्षे) घरात आरडाओरडा सुरु केला. अनुरागच्या पत्नीने खोलीत धाव घेतली असता, मेव्हणीने असा गंभीर आरोप केला की, तिच्या दाजीने (अनुराग) तिला पकडून तिचा विनयभंग केला.

Air Force Personnel Acquitted
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

या घटनेने कुटुंबात खळबळ उडाली आणि पत्नीने तातडीने पोलिसांना पाचारण केले. ऑगस्ट 2019 मध्ये मेव्हणीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आणि सप्टेंबरमध्ये अनुरागला अटक करुन तुरुंगात धाडण्यात आले. 19 दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली, मात्र त्याच्यावर लावलेला 'कलंक' आणि सुरु झालेली कायदेशीर कारवाई त्याचे आयुष्य बदलून टाकणारी ठरली.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान डिसेंबर 2021 मध्ये या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. पीडित मुलीने न्यायालयात (Court) दिलेल्या साक्षीने सर्वांनाच थक्क केले. तिने न्यायाधीशांना सांगितले की, त्या रात्री ती 'अँटीबायोटिक' औषधे घेऊन झोपली होती. औषधांच्या प्रभावामुळे तिला गाढ झोप लागली होती आणि स्वप्नात तिला असे जाणवले की दाजीने तिला पकडले आहे. अर्धवट झोपेत तिला तो 'भ्रम' झाला आणि तिने आरडाओरडा केला. प्रत्यक्षात अनुरागने तिला स्पर्शही केला नव्हता किंवा खोलीत विनयभंगासारखा कोणताही प्रकार घडला नव्हता. पीडितेच्या वडिलांनी आणि मोठ्या बहिणीनेही (अनुरागची पत्नी) न्यायालयात कबूल केले की, केवळ गैरसमजातून आणि भ्रमातून हा खटला दाखल करण्यात आला होता.

Air Force Personnel Acquitted
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

न्यायालयात निर्दोष सुटका झाल्यानंतर अनुरागने आपल्या वेदना व्यक्त केल्या. त्याने आरोप केला की, या संपूर्ण प्रकरणामागे केवळ एक स्वप्न नव्हते, तर त्याच्या सासऱ्यांचा मालमत्तेसाठी असलेला हव्यास कारणीभूत होता. लग्नानंतर 10 दिवसांतच सासऱ्यांनी त्याच्यावर मालमत्ता पत्नी आणि मेव्हणीच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र यास नकार दिल्याने त्याला अडकवण्यासाठी या 'भ्रमा'चा हत्यार म्हणून वापर करण्यात आला, असा खळबळजनक दावा अनुरागने केला. या सात वर्षांच्या कालावधीत त्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला, समाजात त्याची बदनामी झाली आणि हवाई दलातील त्याची पदोन्नतीही रोखली गेली.

Air Force Personnel Acquitted
Uttar Pradesh Crime: ‘’ती दुसऱ्या मुलाशी बोलत होती म्हणून...’’; आरोपी तरुणाने दिली गुन्ह्याची कबुली

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि पीडितेने स्वतः दिलेली साक्ष विचारात घेऊन अनुरागची निर्दोष सुटका केली. मात्र, या निकालाने पुन्हा एकदा कायदेशीर वर्तुळात गंभीर चर्चेला तोंड फोडले. एखादा खोटा आरोप एखाद्या निष्पाप व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा आणि करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त करु शकतो. कायद्याचा वापर जेव्हा वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा चुकीच्या हेतूने केला जातो, तेव्हा न्यायाची प्रक्रिया केवळ आरोपीसाठीच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेसाठी आव्हानात्मक ठरते. अनुराग शुक्लाला न्याय मिळाला असला, तरी त्याने गमावलेली सात वर्षे आणि सोसलेली मानहानी भरुन निघणे कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com