Ravichandran Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: मुंबई कसोटीत रविचंद्रन अश्विन करणार 'ट्रिपल सेंच्युरी'

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) पुन्हा एकदा परदेशी फलंदाजांसाठी डोखेदुखी ठरत आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) पुन्हा एकदा परदेशी फलंदाजांसाठी डोखेदुखी ठरत आहे. भारत दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड (New Zealand) संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अश्विनसमोर हात टेकले आहेत. कानपूर कसोटी जिंकण्यात अपयशी ठरलेल्या अश्विनने मुंबई कसोटीत किवी संघावर वर्चस्व गाजवत भारताला विजयाच्या जवळ नेले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी अश्विन संघासाठी सामना आणि मालिका जिंकू शकतो. त्याचबरोबर विशेष कामगिरीही संघासाठी करु शकतो.

अश्विनने या कसोटीच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत 3 बळी घेतले असून सामन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत किवी संघाच्या उर्वरित पाच बळींमधून आणखी एक विकेट घेतल्यास तो मायदेशात 300 कसोटी बळी पूर्ण करेल. असे केल्यास तो भारतातील दुसरा आणि जगातील सहावा गोलंदाज ठरेल. अश्विनने आतापर्यंत भारताच्या 49 कसोटी सामन्यांमध्ये 299 बळी घेतले आहेत. भारतासाठी ही कामगिरी करणारा एकमेव अनुभवी गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) आहेत. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 619 बळी घेणारा माजी लेगस्पिनर म्हणून कुंबळे यांनी भारतीय भूमीवर 63 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 350 बळी घेतले.

त्याचवेळी श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) या बाबतीत आघाडीवर आहे. कसोटीत सर्वाधिक 800 बळी घेणाऱ्या मुरलीने श्रीलंकेच्या भूमीवर अवघ्या 73 कसोटी सामन्यांमध्ये 493 बळी घेतले, विशेष म्हणजे हा विश्वविक्रम आहे. त्यांच्याशिवाय जेम्स अँडरसन (402), स्टुअर्ट ब्रॉड (341) आणि शेन वॉर्न (319) यांचाही या यादीत समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT