IND vs NZ : द्रविड-कोहली जोडीही जमली, टीम इंडियाने कसोटी दिमाखत जिंकली

न्यूझीलंडने भारतात 37 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये किवी संघ केवळ दोन कसोटी जिंकू शकला आहे, तर 15 कसोटी सामने गमावल्या आहेत.
कसोटी
कसोटी Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई कसोटीत (Mumbai Test) भारताने न्यूझीलंडचा (IND vs NZ) 372 धावांनी मोठा पराभव केला आहे. यासह भारताने 2 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती. मुंबई कसोटी जिंकण्यासाठी भारताने न्यूझीलंडसमोर 540 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्यावर न्यूझीलंड मात करू शकला नाही आणि 167 धावा करून किवींची आख्खी टीम गारद झाली. या दणदणीत पराभवामुळे न्यूझीलंडची भारतात मालिका जिंकण्याच स्वप्न अधुरेच राहीलं आहे. गेल्या 33 वर्षात न्यूझीलंड (New Zeeland) भारतात कसोटी सामना जिंकता आला नाही. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग होती. कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीतील ही भारताची पहिली मायदेशातील मालिका होती. या आवृत्तीची सुरुवात त्यांनी इंग्लंड दौऱ्याने केली.(IND vs NZ : India won test series by 1-0)

विशेष म्हणजे राहुल द्रविड (Rahul Dravid) कोच म्हणून तर विराट (Virat Kohli) कर्णधार म्हणून पहिल्यांदा एकत्र आले होते. यापूर्वी राहुल द्रविड कोच झाल्यानंतर त्यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने T-20 मालिकेत किवीचा धुराळा उडवला होता आणि त्यावेळेसही रोहित आणि द्रविडचे सुत जुळले अशा चर्चा रंगल्या होत्या त्यातच आता कोहलीच्या नेतृत्वात देखील टीमने विजय मिळवला आहे आणि आता कोहली आणि द्रविड ही एकत्र येत टीम दिमाखात कामगिरी करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

1956 पासून न्यूझीलंडचा हा 12 वा भारत दौरा होता. या दौऱ्यासह, त्याने भारतात 37 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये किवी संघ केवळ दोन कसोटी जिंकू शकला आहे, तर 15 कसोटी सामने गमावल्या आहेत. यावरून त्याचा भारतातील रेकॉर्ड किती वाईट आहे हे स्पष्ट होते. न्यूझीलंडने 1988 मध्ये टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. न्यूझीलंडने भारतात कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. गेल्या 65 वर्षांपासूनची ही प्रतीक्षा यावेळीही कायमच राहिली आहे.

भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 62 धावांवर गारद झाला होता. यानंतर भारताने आपला दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 540 धावांचे लक्ष्य ठेवले. पण वानखेडेच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडचा दुसरा डावही निराशाजनक ठरला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 5 गडी गमावून 140 धावा केल्या होत्या.चौथ्या दिवशी न्यूझीलंडने या धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र अवघ्या 45 मिनिटांत उर्वरित 5 फलंदाजही पॅव्हेलियनमध्ये परतले आणि सामना भारताच्या झोळीत पडला. अशाप्रकारे टीम इंडियाने केवळ या सामन्यावरच कब्जा केला नाही तर मालिकेवरही कब्जा केला आहे. धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 337 धावांनी पराभव केला होता.

कसोटी
IND vs NZ: टीम इंडिया सज्ज, वानखेडेवर किवी आज होणार चितपट

भारताने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी केली. दुसऱ्या डावात सलामीवीर मयंक अग्रवालने 108 चेंडूत 62 धावा केल्या. तर चेतेश्वर पुजाराने 97 चेंडूत 47 धावा पूर्ण केल्या , शुभमन गिल 75 चेंडूत 47 अक्षर पटेल 26 चेंडूत नाबाद 41आणि कर्णधार विराट कोहलीने आपल्या 34 धावा 84 चेंडूत पूर्ण केल्या आहेत. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात 119 धावांत सर्व 10 बळी घेणारा फिरकीपटू एजाज पटेलने दुसऱ्या डावात 106 धावांत चार बळी घेतले, तर रचिन रवींद्रने 56 धावांत तीन बळी घेतले. पटेलने या सामन्यात 225 धावा देत 14 विकेट घेतल्या. भारतातील कोणत्याही परदेशी गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com